अर्रर्र! हिल्सवर थिरकणं महिलेला पडलं महागात; पाय घसरला अन्..., Viral Video (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. डान्सचे तर अनेक व्हिडिओ तुम्हा पाहिले असतील. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले टॅलेंट दाखवत असतात. तुम्ही लग्न समारंभातील डान्सचे देखील अनेक व्हिडिओ पाहिले असतील. काही डान्सचे व्हिडिओ इतके चांगले असतात की त्यांचे रिमेक तयार केले जातात. तर काही डान्स व्हिडिओ पाहून हसावे की रडावे हे कळत नाही. तर काहींच्या अंगात डान्स करण्याचा कधी न पाहिलेला उत्साह दिसून येतो. पण अनेकदा त्यांचा हा अतिउत्साह त्यांच्याच आंगलट येतो.
सध्या असाच एका महिलेच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका लग्नाच्या डान्स कार्यक्रमादरम्यान एका महिलेा डान्सचा अति उत्साह नडला आहे. याशिवाय, हिल्सची सॅंडल घालून डान्स केल्याने तर महिलेला चांगलाच झटका बसला आहे. डान्स करता करता महिलेचा पाय घसरुन जोरदार आदळते. यामुळे संपूर्ण कार्यक्रमात हशा पिकतो.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, बऱ्याच महिला एका कार्यक्रमासाठी एकत्र जमल्या आहेत. याच वेळी एक महिला बोले चूडिया गाण्यावर डान्स करत आहे. सुरुवातील ती गोल फिरुन छान अशी डान्सची सुरुवात करते. तिचा डान्स आणि एक्सप्रेशन अगदी स्पष्ट आणि छान असतात. याच वेळी इतर महिला तिला साथ देत टाळ्या वाजवत असतात. दरम्यान महिलेने हिल्सची सॅंडल घालून डान्स करत असते. यावेळी अचानक तिचा तोल जातो. तोल जाऊन महिला धाडकन आपटते. त्यानंतर काही महिला तिला उठवण्यासाठी तिच्या मदतीला येतात. तर काही महिला पोट धरुन हसत असतात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
😂wait for end 😂😂#VIDEO #viral #ViralVideos #videos #fun pic.twitter.com/hWZNViOuSa
— Amit Sharma (@amitsharma8683) April 29, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @amitsharma8683 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने विनोदी शैलीत म्हटले की, बैल सांडला, बैल सांडला, तर दुसऱ्या एका युजरने ब्रेक फेल झाले वाटतं असे म्हटले आहे. आणखी काहींनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.