थरारक! ढाब्यावर लोक जेवत होते इतक्यात मागून भरधाव वेगात कार आली अन्...; VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तसेच अनेक सत्य घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. हे थरारक व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो. सध्या रस्ते अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सध्या असाच एक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा अपघात गुजरातमध्ये घडला असल्याचे सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक एसयूव्ही कार अचानक एका ढाब्यात घुसली. यामुळे तीन तरुणांना गंभीर दुखापत झाली आहे. हे तरुण ढाव्यात जेवत असताना कार भरधाव वेगात आली आणि ढाब्यात शिरली. जेवत असलेल्यांना आपला जीव वाचवण्याची संधा देखील मिळाली नाही. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, काही लोक ढाब्यात बसून जेवण करत आहेत. त्याचवेळी एक कार मागून येताना दिसते. कार इतक्या ऊरधाव वेगात असते की, लोक उठेपर्यंत ती सर्वांना उडवते. तसेच कार चालक सतत हॉर्न वाजवत आणि हेडलाईट मारत होता मात्र, लोकांना काही कळण्याच्या आधीच ढाब्यात घुसली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटना स्थळी पोहोचले. त्यांनी सागितले की, कार अनियंत्रित झाल्याने हा अपघात घडला. सध्या अपघातात जखमी झालेल्यांवर उपचार सुरू आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
सड़क किनारे छोटे से ढाबे पर लोग कैसे आराम से खाना खा रहे हैं, उन्हें क्या पता कि कौन पागल बगल सड़क पर उनका काल बनने गाड़ी चला रहा है। ढाबों को रौंदता हुआ कार चालक लोगों को रौंदता हुआ निकल गया। तीन युवक गंभीर रूप से घायल हैं। वीडियो गुजरात के छोटा उदेपुर जिले के बोडेली का है। pic.twitter.com/WlqvI45Pwj
— thehillnews.in (@thehill_news) December 10, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @thehill_news या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओने अनेकांचा थरकाप उडाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेला आहे. अलीकडे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे लोकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आज सकाळीच मुंबईच्या कुर्लात देखील बसचा भीषण अघात झाला होता. या अपघातात 17 जण जखमी आणि तीन जणांचा मृत्यू झाला.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.