आईपण! वासराला 500 मीटरलांबपर्यंत ओढत नेलेल्या कारला गायीच्या कळपाने घातला विळखा; VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा स्टंट, जुगाड, डान्स रिल्स असे व्हिडिओ तर कधी सत्य घटनांचे अपघातांचे व्हिडिओ वैगेर पाहायला मिळतात. प्राण्याशी संबंधित देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका वासराच्या अपघाताचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओवर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
भारतात गायीला मातेप्रमाणे पुजले जाते. तिच्या वारासोबत माणसांचे एक अनोखे नातं असते. मात्र, काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे या छोट्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक वासराला गाडीने 500 मीटरलांबपर्यंत ओढत नेले आहे. यामुळे गायीचा कळप त्या कार मागे धावला आणि त्याला विळखा घातला आहे. नक्की काय घेडले ते जाणून घेऊयात.
नेमकं काय घडलं?
व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका कार चालका वेगाने जात आहे. त्याच्या मागे गायींचा कळप धावत आहे. एका ठिकाणी जाऊन कारला गायी विळखा घालतात. कार चालक गाडी थांबवतो. त्यानंतर लोकांच्या लक्षात येते की, गाडीच्या खाली एक वासरु आलेले आहे. गायी तिथेच कारला विळखा घालत असतात. लोकांना समजताच लोक वासराच्या मदतीला धावून येतात. अनेकजण मिळून कारला पलटी करतात आणि वासराला बाहेर काढतात. त्याच वासराला चांगलेच लागलेल तुम्ही पाहू शकता.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. कार चालकाने वासराला धडक दिल्यानंतर कार न थांबवली नाही. हा प्रकार पाहून अनेकजण संतापले आहेत. या वेदनागदायी प्रकरणाने अनेकांजणांनी व्हिडिओवर तीव्र प्रितिक्रीया दिली आहे. ही घटना छत्तीसगढमध्ये घडले असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @political_aura या अकाऊंटवर शेअर केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, किती नालायक लोक आहेत ही, लोकांना तर मारतच होते आणि आता प्राण्यांनापण.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.