viral video crocodile attacks on man while he tries to catch her video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तसेच अनेकवेळा प्राण्यांशी संबंधित देखील भयावह व्हि़डिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. स्टंटबाजीचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील यामध्ये लोक आपण किती शूर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूजसाठी धोकादायक स्टंट देखील करतात.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती महाकाय मगरीला पकडण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्याच्यासोबत असे काही घडले आहे की, व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. व्हायरल होत असलेल्या व्हि़डिओत तुम्ही पाहू शकता की, एक मगर चिखलामध्ये शांत बसलेली आहे. याच वेळी एक तरुण मागून येतो. तरुण मगरीच्या शेपचटीला पकडून तिला ओढण्याचा प्रयत्न करतो. मग अगदी शांत आरामत बसलेली असते. परंतु व्यक्तीच्या या कृत्याने मगर अचानक मागच्या बाजूला फिरते आणि व्यक्तीवर हल्ला चढवते. व्यक्ती वेळेत दुसऱ्या बाजूला उडी मारतो आणि भीतीने पळून जातो. सुदैवाने व्यक्तीचा जीव वाचतो. परंतु मगरीला डिवचणं तरुणाला चांगलेच महागात पडले असते.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @therealtarzann या अकाउंटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर आपल्या विविध प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने कॅमेरामॅनला कधीच काही होत नाही असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने युजरने लोक स्वत:च्या जीवाशी का खेळतात असा प्रश्न केला आहे. तिसऱ्या एका युजरने प्राण्यांना त्रास देण्यात यांना मज्जा येते असे म्हटले आहे. अनेकांना याला मुर्खपणा म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या वेगाने व्हायरल होत आहे. परंतु असे स्टंट करणे धाडसाचे कृत्य नाही हे नक्कीच.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.