बाईईईईई काय हा प्रकार? जिवंत बेडकाला डोक्यावर अन् गळ्यात लटकवून तरुणीने केला डान्स; VIDEO पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Viral News Marathi: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर तर कधी भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण, डान्स रिल्स यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अलीकडे लोक लाईक्स आणि व्ह्यूज साठी अशा विचित्र-विचित्र गोष्टी करतात की पाहून हसू आवरणे देखील कठीण होऊन जाते. लोक असे चित्र-विचित्र कृत्य करतात की, ज्याची कोणी कल्पना देखील केली नसेल.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका महिलेने डान्स रिल बनवताना असे काही केले आहे, की हा व्हिडिओ पाहून तुम्ही कपाळाला हात लावाल आणि हसून हसून तुमचे पोटही दुखून येईल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी डान्स रिल बनवत आहे. तिने तिच्या डोक्यावर एका बेडकाला ठेवले आहे. तसेच तिच्या गळ्यामध्येही एक जिवंत बेडकाला लटकवलेले आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, तरुणीने मुकूटासारखे एका जिंवत बेडकाला बसवले आहे, तर एका बेडकाला गळ्यात हारासारखे घातले आहे. असे करत ती डान्स रिल बनवत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये संपूर्ण बेडूक समाज घाबरलेला आहे असे म्हटले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने नवऱ्याने मंगळसूत्र नाही दिले वाटतं असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने दीदी दूसरे काही मिळाले नाही का असा प्रश्न केला आहे. तिसऱ्या एका युजरने बिचाऱ्या बेडकांवर किती अन्याय होत आहे असे म्हटले आहे. तर आणखी एका युजरने दीदी मगरमच्छ, या चिपकली पण घालू शकता तुम्ही असे म्हटले आहे. अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी देखील शेअर केले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.