बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना एका काॅलेजच्या आवारात घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये वृद्ध वडिल मुलीची समजूत काढताना दिसून येतात. मुलगी आपलं काहीच ऐकायला तयार नाही हे जेव्हा त्यांच्या ध्यानात येतं तेव्हा ते अक्षरश: मुलीच्या हाता-पाया पडून लागतात. इज्जत वाचवण्यासाठी ते मुलीकडे प्रियकराला सोडण्याची विनवणी करतात. पण दुसरीकडे मुलगी मात्र वडिलांचे ऐकून घ्यायला तयार नसते. वडिलांच्या भावनांकडे दुर्लक्ष करत ती प्रियकराची निवड करते. तिथे उपस्थित काहींनी ही घटना मोबाईल फोनमध्ये कैद केली आणि याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला. या व्हिडिओमुळे वैयक्तिक निर्णय, कौटुंबिक बंध आणि पालक-अपत्य यांच्यातील नातेसंबंध यांबाबत ऑनलाइन चर्चा सुरू झाली आहे.
View this post on Instagram
व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी मुलीच्या वागण्यावर नाराजी व्यक्त करत पालकांच्या दु:खावर सहानभूती व्यक्त केली आहे. ही घटना @foofaji नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंवर शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सने घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “तिने तिच्या आईवडिलांना रडवले आहे, कर्म फिरुन पुन्हा तिच्याकडे परत येईल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला वाटते की हे एक नाटक आहे आणि ते महाविद्यालयाच्या वर्गात सादर केले जात आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “हा सर्व फालतूपणा करण्यापेक्षा वडिल आनंदाने मुलीचे लग्न का लावून देत नाही?”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






