प्रेमाचा राडा! एका बॉयफ्रेंडसाठी चार तरुणी आपापसांत भिडल्या; झिंज्या उपटत एकमेकींना जमिनीवर लोळवले, Video Viral (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. भांडणाचे तर अनेक व्हिडिओ पाहिले असतील. लोक कधीही कुठेही भांडणे सुरु करतात. कधी रस्त्यावर, कधी बसमध्ये, कधी मेट्रोत जिकडे-बघावे तिकडे छोट्या छोट्या कारणांवरुन भांडणे सुरु असतात. यामध्ये महिलांच्या भांडणाचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये चार तरुणी एका बॉयफ्रेंडवरुन हाणामारी करत आहे. तुम्ही बरोबर वाचलात, एकासाठी चार-जणी आपापसांत भांडत आहेत. मध्यप्रदेशच्या इंदोरमध्ये ही घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंदोरमध्य चार मुलींच्या ग्रुपमध्ये भर रस्त्यात भांडणे झाली आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, चार-पाच मुली एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारत आहेत. अक्षरश: एकमेकींच्या झिंज्या उपटत, एकमेकींना जमिनीवर लोळवत तरुणींची हाणामारी सुरु आहे. मध्यरात्री ही घटना घडली आहे. तरुणींची हाणामारी पाहण्यासाठीही लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. अनेकांनी तरुणींना थांबवण्याचा प्रयत्न केला पण एकहीजण ऐकायला तयार नव्हती. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इंदोरच्या लाईट हाऊस पब बाहेर ही घटना घडली. नशेच्या अवस्थेत या मुलींनी एकमेकांना मारायला सुरुवात केली.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
इंदौर – लाइट हाउस पब के बाहर नशे में धुत युवतियों ने जमकर किया हंगामा, सड़क पर मारपीट का वीडियो वायरल, नाचने के दौरान धक्का लगने की बात पर भिड़ी नशेड़ी युवतियां #Indore #Beating #LightHousePub #Fight #ViralVideo @CP_INDORE @MPPoliceDeptt #MPNews #PeoplesUpdate pic.twitter.com/C2SCgBnSd6
— Peoples Update (@PeoplesUpdate) May 19, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @PeoplesUpdate या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.