(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक धक्कादायक घटना व्हायरल होत असतात ज्यातील दृश्ये आपल्या कल्पनेपलीकडची असतात. त्यातच आता इंदोरमधील अशीच एक धक्कादायक आणि हादरवून टाकणारी घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एक गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडला बेदम मारहाण करताना दिसून आली. आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी ती बॉयफ्रेंडला अर्धनग्न करते आणि अक्षरशः त्याच्या छातीवर पाय ठेवत त्याला सटासट मारायला सुरुवात करते. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
हा व्हायरल व्हिडिओ मंगळवारी रात्री इंदूरच्या लासुडिया पोलिस स्टेशन परिसरातील स्कीम नंबर ७८ येथील क्लिफ्टन कॉर्पोरेट बिल्डिंगसमोरील असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण झालेला तरुण आणि त्याला मारहाण करणारी मुलगी दोघेही प्रेयसी आणि प्रियकर आहेत. प्रेयसीला तिचा बॉयफ्रेंड दुसऱ्या मुलीला हॉटेलमध्ये घेऊन जात असल्याची सूचना मिळाली होती. मग काय झालं, ती मुलगी धावत धावत घटनास्थळी पोहोचली.
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की, मुलीने तिच्या प्रियकराला रस्त्याच्या मधोमध पकडलं आणि काहीही न बोलता किंवा ऐकून न घेता, त्याला चप्पल आणि लाथांनी मारहाण करायला सुरुवात केली. रस्त्याने जाणाऱ्यांनी ही घटना त्यांच्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड केली. व्हिडिओमध्ये मुलगी जोरजोरात ओरडताना दिसून आली यावेळी ती म्हणते की , मी तुझी पत्नी आहे आणि तू दुसऱ्या मुलीशी बोलतोस. मुलीने तरुणाची पँटही काढली आणि रस्त्यावर झोपवत त्याच्या छातीवर लाथा मारत त्याला धु धु धुतले. त्याचवेळी, तरुण दारूच्या नशेत असल्याचे दिसून येते. दरम्यान त्यांच्यातील हा वाद मिटवण्यासाठी काही लोकांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला पण मुलीने त्यांनाही धमकावत मागे ढकलले. सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. भांडणानंतर ते दोघेही तिथून निघून गेले.
दरम्यान हा व्हिडिओ @_indore_update नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून अनेक युजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “कसा प्रियकर आहे जो बुटांनी मार खात आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “चांगले केले” तर आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जर प्रेयसी दुसऱ्या बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये पकडली गेली तर काय होईल?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.