'तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला' ; मुंबई लोकलमध्ये मराठी तडका; तरुणींचा भन्नाट डान्स Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ दर सेकंदाला व्हायरल होत असतात. अकीडच्या काळात सोशल मीडिया हे लोकांसाठी आपल्या कला सादर करण्याचे एक अनोखे माध्यम बनले आहे. कोणी डान्स, तर कोणी स्टंट, तर कोणी चित्रकलेच्या माध्यमातून आपले कौशल्य जगासमार मांडतात. मुंबईच्या लोक ट्रेनमधील तर असे कलाकारांचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. कधी लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणारे, तर कधी लोकल मधील भांडणे तर कधी लोकांचे डान्स व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
मुंबईच्या लोकांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनलेल्या या लोकल ट्रेनमध्ये रोज वेगवेळ्या गोष्टींचा अनुभव पाहायला मिळतो. कधी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम तर कधी पुरुषांचा भजनाचा कार्यक्रम ही लोक ट्रेन पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनत आहे. सध्या मुंबई लोकलमध्ये काही तरुणींनी डान्स केलेला व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, यामध्ये पाच तरुणी छान नटलेल्या दिसत आहेत. या तरुणींनी हिरव्या रंगाची साडी नेसलेली आहे. या मुलींनी तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला या गाण्यावर डान्स केला आहे. या मुलींचा उत्कृष्ट डान्स पाहून अनेकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर कौतुक केले आहे. या मुली गेल्या काही दिवसांपासून असे अनेक व्हिडिओ बनवत असून यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला देखील काही तासांतच हजारोहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @riaa_2712 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी या मुलींचे कौतुक केले आहे. एका युजरने मस्त तायडे असे म्हटले आहे तर दुसऱ्या एकाने बरं मस्त जागा मिळाली असे म्हटले आहे. आणखी एका युजरने तायडे भारीच डान्स केला असे म्हटले आहे. यासांरख्या अनेक प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.