एक रुपयांत ड्रेसची स्कीम आली दुकानदाराच्या आंगलट; गिऱ्हाईक आले अन् उडाली झुंबड, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय, भांडणाचे देखील अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. सध्या असाच एक काहीसा पुण्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, यामध्ये दोन, तीन नाहीतर 50 हून अधिक महिला एका कापड दुकानदाराशी भांडयला आल्या आहेत. एवढेच नव्हे तर या महिलांनी दुकानदाराला दुकान फोडण्याची देखील धमकी दिली आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की या महिला अशा का करत आहेत?
तर झालं असे की, या कापड दुकानदाराला त्याचीच एक स्कीम आंगलट आली आहे. तुम्हाला माहितच असेल दुकानाचा सेल वाढवण्यासाठी, अनेकदा वेगलवेगळ्या स्कीम ठेवल्या जातात. जसे की एका वस्तूवर एक वस्तू फ्री, किंवा वस्तूंवर काही टक्क्यांची सूट, तर कोणी एखाद्या वस्तूवर खास भेट देतं. पण हा पुण्यातील दुकानदार एक पाऊल पुढे गेला आहे. या दुकादाराने 1 रुपयांत 1 ड्रेस विकण्याची स्कीम ठेवली होती, जी आता त्याच्या आंगलट आली आहे.
या स्कीमचा फायदा उचलण्यासाठी दुकानाच्या बाहेर लांबच्या लांब महिलांची रांग लागली आहे. आणि विशेष म्हणजे ही झुंबड पाहून दुकानदार दुकान बंद करुन बसला आहे. यामुळे जमा झालेल्या महिलांनी मोठा गोंधळ केला आहे. 1 रुपयांत कपडे दिले नाही तर आख्खं दुकान फोडून टाकू अशी धमकी देखील काही महिलांनी दिली आहे. सध्या या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
मीडिया रिपोर्टनुसार, ही घडना पुण्यातील राजगुरु नगर भिमाशंकर मार्गावर घडली असून या दुकानदाराने 26 जानेवारी निमित्त ही स्कीम लागू केली होता. मात्र, दुकानच्या बाहेर ग्राहकांची विशेषत: महिलांची भयंकर गर्दी झाली. अक्षरश: 1 रुपयांत कपडे खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. पण इकत्या लोकांना ड्रेस देणं दुकानदाराला शक्य नव्हतं यामुळे ग्राहकांना पळवून लावण्यासाठी त्याने दुकानाला टाळा लावला. ही गर्दी हटवण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी येऊन मधस्थी करावी लागली.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @punelocalconnect या अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया देकील दिल्या आहेत. एका युजरने लाडक्या बहिणी 1 रुपयांत ड्रेस घेतल्याशिवाय मागे फिरणार नाहीत असे म्हटले आहे. तर काहींनी महिलांची फिरकी घेतली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.