भावाने तर राडा केला! चिमुकल्याचा जबरदस्त लावणी ठुमका पाहिला का? पाहून पडाल प्रेमात, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण आपल्याला रिल बनवताना दिसतात. अलीकडे लहानमुलांमध्ये तर सोशल मीडियाप्रति खूप उत्सुकता वाढली आहे. अनेक लहान मुलांचे व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. कधी डान्स, तर कधी कोणी स्वयंपाक करताना, तर कधी कोणी काहीतरी मजेशीर बोलताना, रडतानाचे असे अनेक व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
या लहानग्यांमध्ये तर अनेक कलाकार लपलेले असतात. त्यांचे डान्स व्हिडिओ पाहिले तर अगदी आश्चर्य वाटते. तोंडातून फक्त वाह वाह बाहेर पडते. काय ती स्टाईल, काय तो ठुमका, आणि काय ती अदा असे म्हणल्याशिवाय आपण राहत नाही. आता तर फक्त मुलीच नाही तर मुलेही यामध्ये पुढे असतात. अगदी लावणीही मुले करतात. सध्या असाच एक गोंडस चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका लावणीवर लगानग्याने जबरदस्त ठुमका धरला आहे.
हा व्हिडिओ एका शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमातील आहे. या ठिकाणी आजूबाजूल अनेक लहान मुले आपल्या डान्स साठी तयार होऊन आलेले दिसत आहेत. तसेच अनेक प्रेक्षकही दिसत आहेत. याचवेळी हा चिमुकला शाळेच्या गणवेशात स्टेजच्या मधोमध उभा आहे. लावणी सुरु होताच तो अगदी मस्त असा ठुमका देत सुरुवात करतो. राया प्रिरतीच्या झुल्यात जुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलावा या लावणीवर या चिमुकल्याने नखरेल अदा देत जबरदस्त लावणी केली आहे. आजूबाजूचे लोकही त्याला टाळ्या वाजवून प्रोत्साहित करत आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटपॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी या छोट्या कलाकाराचे कौतुक केले आहे. एका युजरने म्हटले आहे, याला म्हणतात अस्सल लावणी, तर दुसऱ्या एका युजरने आहाहा! काय अदा आहे असे म्हटले आहे. तर अनेकांनी व्हिडिओ काढणाऱ्या ट्रोल केले आहे. व्हिडिओ काढणाऱ्याने कॅमेरा नीट न धरल्याने व्हिडिओ चांगला आला नाही असे लोकांनी म्हटले आहे. तसेच अनेकांनी वाह! काय टॅलेंट आहे असे म्हणून हार्ट इमोडी शेअर केले आहेय या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये भावाने तर राडा केला असे म्हटले आहे. व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.