Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बिअर्ड हटावो, प्यार बचावो’, मुलांच्या दाढी विरोधात मुलींचा मोर्चा; व्हिडिओ तूफान व्हायरल

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा अशा गोष्टी सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात ज्या पाहून आश्चर्य वाटते तर अनेकदा हास्यास्पद गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 20, 2024 | 02:49 PM
'बिअर्ड हटावो, प्यार बचावो', मुलांच्या दाढी विरोधात मुलींचा मोर्चा; व्हिडिओ तूफान व्हायरल

'बिअर्ड हटावो, प्यार बचावो', मुलांच्या दाढी विरोधात मुलींचा मोर्चा; व्हिडिओ तूफान व्हायरल

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा अशा गोष्टी सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात ज्या पाहून आश्चर्य वाटते तर अनेकदा हास्यास्पद गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड, भांडण यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतातच पण अनेकदा सोशल मीडियावर वेगवेगळ्या चळवळींचे व्हिडिओ देखील आपल्याला पाहायला मिळतात. काही महिन्यांपूर्वी मुलांचा ब्युटीपार्लर विरोधात मोर्चा निघालेला व्हिडिओ तूफान व्हायरल होत होता.

सध्या असाच एक काही मुलींचा व्हिडिओ मुलांविरोधात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल विशेषत: मुलांना. मुलींनी अगदी आगळा-वेगळा मोर्चा काढला आहे. ‘क्लीन शेव बॉयफ्रेंड’ साठी ही रॅली मुलींनी काढलेली दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण चक्रावले आहेत. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही. परंतु हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कशासाठी मोर्चा? 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही मुली मोर्चा काढताना दिसत आहेत. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मुली मुलांच्या दाढी विरोधात मोर्चा काढताना दिसत आहेत. अनेक मुलींनी तशी खोटी दाढी लावली आहे.या मुली क्लीन शेव बॉयफेंड म्हणत मोर्चा काढत आहेत. तसेच त्यांच्या हातात वेगवेगळे पोस्टर आहे. या पोस्टरवर लिहिले आहे की ‘No Clean Shave No Love’ आणखी एका पोस्टरवर लिहिले आहे की ‘दाढ़ी हटाओ प्यार बचाओ।’ ‘दाढ़ी रखो या गर्लफ्रेंड रखो, Choice तुम्हारी।’ असेही एका पोस्टरवर लिहिलेले आहे. व्हिडिओमध्ये मुली अशा घोषणाही देत आहेत. मात्र या मोर्चासंदर्भात कोणतीही माहिती नाही.

हे देखील वाचा- विद्यार्थी जोमात शिक्षक कोमात! इतिहासाच्या पेपरमध्ये विद्यार्थ्याचे भन्नाट उत्तर; पाहून खळखळून हसाल

व्हायरल व्हिडिओ

Clean shave ke liye ladkiyon ne kiya kalesh🤯 pic.twitter.com/QkmIROdDyk — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 17, 2024


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, दाढीमध्ये यांना काय अडचण आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, मुलांनी मेकअप विरोेधात मोर्चा काढावा, तर तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, या मुलींचा बॉयफ्रेंड कोणाला बनायचे, तर काहींनी म्हटले आहे की, हे सगळे फक्त रीलसाठी आहे, असा स्टंट काही कामाचा नाही. हा व्हिडिओ मात्र तूफान व्हारल झाला आहे.

हे देखील वाचा- रावणाचा वध कोणी केला? चिमुकल्याचे उत्तर ऐकून पोट धरून हसाल; व्हिडिओ होतोय व्हायरल

Web Title: Viral video girls march against boys beards video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2024 | 02:46 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
1

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

‘…आणि यांना हवाय विकसित भारत’! लोकांनी लाज सोडून थेट सरकारी सिमेंटच चोरलं; लाजिरवाणा VIDEO VIRAL
2

‘…आणि यांना हवाय विकसित भारत’! लोकांनी लाज सोडून थेट सरकारी सिमेंटच चोरलं; लाजिरवाणा VIDEO VIRAL

इज्जतीचा भाजीपाला! धावत्या गाडीतून नारळ चोरी करायला गेला अन् फजिती करुन बसला; पहा काय घडलं? Video Viral
3

इज्जतीचा भाजीपाला! धावत्या गाडीतून नारळ चोरी करायला गेला अन् फजिती करुन बसला; पहा काय घडलं? Video Viral

चोरांमध्येही PM मोदींची क्रेझ! पंतप्रधानांचा मुखवटा घालून लाखो रुपयांचे स्मार्टफोन लंपास केले; पाहून पोलिसही चक्रावले, VIDEO VIRAL
4

चोरांमध्येही PM मोदींची क्रेझ! पंतप्रधानांचा मुखवटा घालून लाखो रुपयांचे स्मार्टफोन लंपास केले; पाहून पोलिसही चक्रावले, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.