फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज काहीतरी वेगळे पाहायला मिळत. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्य वाटते की खरेच असे होऊ शकते का? तर अनेकदा असे व्हिडिओ आपण पाहतो की, हसून हसून पोट दुखून येते. सोशल मीडियावर लहानांपासून मोठयांपर्यंत सगळेच काही ना काही व्हिडिओ बनवत असतात. सध्या असाच एक चिमुकल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या चिमुकल्याला विचारलेल्या प्रश्नाचे असे उत्तर त्याने दिले आहे की तुम्ही पोट धरून हसाल.
असे म्हणतात मुले ही देवाघरची फुले असतात. पण हा लहान मुले अनेकदा असे काही बोलून जातात की, मोठ्यांना पण निरूत्तर करतात. तर अनेकदा असे काही बोलतात की, हसून पोट दुखेल. या चिमुकल्याने असेच काहीसे उत्तर दिले आहे. जेव्हा त्याला विचारले की, रावणाचा वध कोणी केला त्यावर त्याने अगदी भन्नाट असे उत्तर दिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. मुलाचे हे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत लोक हा व्हिडिओ खूप पसंत करत आहेत.
मी नाही मारले
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक शिक्षक लहान मुलाला विचारतात की, ‘रावणाला कोणी मारले?’ यावर तो चिमुकला असे काही बोलतो की, ऐकून हसू येईल. तर या प्रश्नाला उत्तर देताना तो मुलगा म्हणतो की, ‘सर, आई शपथ्थ मी मारले नाही, मी पाणी प्यायला गेलो होतो आणि दुसऱ्या एका मुलाकडे बोट दाखवून म्हणतो की, याने मारले आहे.’ यावर मुलाच्या तोंडून असे उत्तर ऐकून शिक्षकही हसू लागतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @aachary_shailendr0216 या अकउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1 कोटीहून अधिक लोकांनी पाहिले आहे लाइक केले आहे. या व्हिडिओवर लोकांनी मजेशीर कमेंटही केल्या. एका यूजरने म्हटले आहे की – तुम्ही हा व्हिडिओ कितीही वेळा बघितला तरी, तो पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल दुसऱ्याने एका युजरने म्हटले आहे की, त्या मुलाने मारले नाही असे म्हणणे बरोबर आहे, तो तर शपथही घेत आहे. तर चौथ्या एकाने युजरने म्हटले आहे की, निरागस मुलाचे हे निरागस उत्तर ऐकून मन प्रसन्न झाले.
हे देखील वाचा- बैलाशी पंगा घेणे तरूणाला पडलं महागात; असा शिंगावर घेतला अन्…, पाहा व्हिडिओ