Viral Video Groom walks trrough traffic chasing his barat video goes viral
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. स्टंट, जुगाड, डान्स, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. तसेच तुम्ही लग्नसमारंभातील अनेक व्हिडिओ देखील पाहिले असतील. असे म्हणतात लग्न ही गोष्टी मुला-मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो. पण अनेकवेळा लग्नात काही ना काही गडबड होते. पण तरीही घरातले लोक या अडचीणींवर मात करत लग्न व्यवस्थित पार पाडतात. कधी नवरदेवाचा कुर्ता घरी राहतो, तर कधी नवरदेवाचा कुर्ता फाटतो. अनेकदा नवरीला तयार होण्यास वेळ गेल्याने देखील मुहुर्ताची मोठी गडबड होते. पण तुम्ही कधी ऐकले का नवरदेवाशिवाय वरात मंडपात पोहोचली आणि नवरेदवच मागे राहिला. असाच काहीसा प्रकार या तरुणासोबत घडला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरदेव ट्राफिकमधून वाट काढत चालला असून त्याची वरात पुढे निघून गेली आहे. यामुळे नवरदेवाची तारांबळ उडाली आहे. वाहनांच्या गर्दीतून कोंढीतून नवरदेव धावत असून एक व्यक्ती त्याचा व्हिडिओ शूट करत आहे. व्हिडिओ काढणाऱ्या त्याला विचारतो की, तू कुठे चालला आहे, तर नवरदेव सांगतो की, वरात त्याला सोडून निघून गेली असून तो वरातीकडे जात आहे. त्याचे भाऊ त्याला मदत करत आहेत. तसेच तुम्ही पाहू शकता की, नवरदेवल एका कारचालकाला त्याला जाण्यासाठी कार मागे घेण्याची विनंती देखील करत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून @shourrya23 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले असून अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी भाऊ ल्गन नको करु असे म्हटले आहे, तर काहींनी अहो नवरदेव संध्याकाळी चालायला गेला आहे असे म्हटले आहे. तर एकाने अहो तुम्ही तुमच्या तीशित लग्न करत आहात आणि लग्न करण्याचा तुमचा पहिला आणि शेवटचा चान्स आहे. आणि अशा वेळी वाहतूक कोंडीची समस्या येऊन पडसलीय बिचारा असे म्हटले आहे. तर काहींनी नवरी वाट बघून मंडप सोडून जाऊ नये म्हणजे झालं.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.