'मेरी शर्ट छोड दो, मम्मी डाटेंगी', आईची एवढी भिती की वाघाला केली विनवणी; चिमुकल्याचा क्यूट VIDEO एकदा पाहाच (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सोशल मीडियावर रोज दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही लहान मुलांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. अनेकदा हे व्हिडिओ इतके क्यूट असतात की, पुन्हा पुन्हा पाहिल्याशिवाय राहत नाही. सध्या असाच एक चिमुकल्याचा क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका प्राणीसंग्रहालयातील असून चिमुकला वाघाला न घाबरता आईला जास्त घाबरत आहे.
अनेकदा तुम्ही पाहिले असेल की, काही मुले अतिशय खोडकर असतात. कोणालाही घाबरत नाहीत पण आपल्या आईला नक्कीच घाबरतात. असाच काहीसा हा व्हिडिओ आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकला प्राणीसंग्रहालयात फिरत असताना वाघाच्या पिंजऱ्या शेजारी गेला आहे. याच वेळी वाघ अचानक त्याचा शर्ट पकडतो. पण आश्चर्याची बाब म्हणजे चिमुकला वाघाला घाबरत नाही तर उलट तो वाघाला विनवणी करत आहे. तो वाघाला शर्ट सोडायची विनवमी करत असून घरी गेल्यावर आई ओरडेल असे म्हणत आहे. चिमुकल्याची ही क्यूट विनवणी पाहून तुम्हालाही हसू येईल. या छोट्याशा पठ्ठ्याला वाघाची भिती नसून त्याची आई शर्ट फाटलेला पाहून त्याला ओरडेल याची भिती आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Kid Starts shouting “Meri shirt chhod de, mummy Daantegi” after Tiger grabeed his shirt in Zoo
pic.twitter.com/gl07jglZ46— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 9, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटपऑर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने बिचारा, आईचा मार पडतोय आता असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने अरे खरंच आई मारते शर्ट खराब झाला तर असे म्हटले आहे. काही युजर्सनी व्हिडिओ बनवणाऱ्यावर संताप व्यक्त केला आहे. मुलाची मदत न करता व्यक्ती व्हिडिओ बनवत असल्याने त्याला अनेकांनी ट्रोल केले आहे. तर अनेकांनी शर्ट वाघाच्या तोंडात कसा गेला असा प्रश्न केला आहे. हा व्हिडिओ अद्याप कुठला आहे आणि कधीचा आहे याची माहिती मिळालेली नाही. पण हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.