काय एक्सप्रेशन, काय स्टेप्स! चिमुकल्या भावा-बहिणींची ही जोडी सोशल मीडियावर घालतेय धुमाकूळ; Video Viral (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सोशल मीडियावर रोज दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, एखादा चित्रपट रिलीज झाला किंवा त्यातील गाणी रिलीज झाली की, लोक त्या गाण्यांवर, डायलॉग्जवर व्हिडिओ बनवतात. सध्या असाच काहीसा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होता आहे. काही महिन्यांपूर्वी फुलवंती हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटतील मदनमंजिरी या गाण्याला भरपूर प्रेम मिळाले होते.
अनेकांनी या गाण्यावर डान्स करुन रिल बनवली होती. या गाण्यातील कलाकार प्राजक्ता माळी ने देखील अनेकांनी रिल बनवण्याचे चॅलेंज दिले होते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत तसेच पुरुषांनी यावर डान्स केला होता. हे गाणे चांगलेच गाजले होते. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका लहान भावा-बहिणीची जोडी या गाण्यावर डान्स करुन सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकती की, एक घरातील दृश्य दिसत असून येथे दोन लहान भाऊ-बहिणी दिसत आहेत. तसेच घरातील काही मंडळी देखील दिसत आहेत. याच वेळी गाणे सुरुच होताच चिमुकली अप्रतिम असे एक्सप्रेशन देत मदनमंजिरी गाण्यावर डान्सला सुरुवात करते. तिच्या तालात ताल मिसळत तिचा भाऊ जुगलबंदी सुरु करतो. दोघेही अप्रतिम अशा स्टेप्स करतात. अगदी प्राजक्ता माळीला देखील मागे टाकतील. हा डान्स सध्या सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस पडत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी या दोघांचे कौतुक केले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @vihaan_24014 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या दोन्ही भावंडांचे कौतुक केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, वा छान स्टेप्स केल्या, तर दुसऱ्या एकाने चिमुकली काय एक्सप्रेशन देतेय असे म्हटले आहे. आणखी एका युजरने भावाने तर जबरदस्त कंबर हलवली असे म्हटले आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. तुम्हाला देखील हा व्हिडिओ नक्की आवडेल.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.