"स्टेशन मास्टर काय करत आहे?" व्यक्ती बांबूने भराभर तोडू लागला AC ट्रेनच्या खिडक्या, Viral Video पाहून युजर्स भडकले
भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क मानले जाते. लांब पल्ल्याचा प्रवास स्वस्तात करण्यासाठी ट्रेन हा एक उत्तम पर्याय आहे. कमी वेळेत आरामदायी प्रवास होत असल्यामुळे अनेक जण ‘वंदे भारत’सह अनेक सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन्सना प्राधान्य देताना दिसतात. सोशल मीडियावर अनेक वेगवगेळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात मात्र सध्या रेल्वे स्टेशनवरील एक धक्कादायक प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे. यात एक व्यक्ती AC ट्रेनच्या खिडक्या बांबूने फोडताना दिसून येत आहे. काय आहे प्रकरण? सविस्तर जाणून घेऊयात.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, एक व्यक्ती बांबू घेऊन जवळ उभ्या असलेल्या AC ट्रेनच्या जवळ येतो आणि अचानक या बांबूने जोरदार प्रहार करत ट्रेनच्या खिडक्या तोडायला सुरुवात करतो. बांबूच्या साह्याने तो खिडक्यांच्या काचा भराभर फोडत राहतो. एकेक करून त्याने अशा अनेक काचा बांबूने फोडल्या. त्यात खिडक्यांच्या काचांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. मुख्य म्हणजे यावेळी इथे एकही रेल्वे पोलीस, टीटी किंवा रेल्वे कर्मचारी उपस्थित नव्हता तसेच स्टेशनवरून जाणारे, येणारे लोकही व्यक्तीच्या या कृतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होते. त्याला रोखण्याचा किंवा जाब विचारण्याचा साधा प्रयत्नही कोणी केला नाही. सर्वजण फक्त हा प्रकार आपल्या उघड्या डोळ्याने बघत बसले.
हेदेखील वाचा – पैठणीसाठी वहिनींमध्ये सुरु झाली हाणामारी, होम मिनिस्टर स्पर्धेतील Viral Video पाहून पोट धरून हसाल
हा सर्व प्रकार दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद केला आणि मग हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओ पाहताच हा कमी वेळेत व्हायरल झाला. आता हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्स भडकले असून “आता कुठेयत रेल्वे पोलीस अन् टीटी”, अशा प्रश्न उपस्थित करत यावर आपला संताप व्यक्त करत आहेत.
हेदेखील वाचा – हा खरा श्रावणबाळ! मंदिराच्या पायऱ्या चढताना आईला त्रास होऊ नये म्हणून लेकाने कडेवर उचलले, हृदयस्पर्शी Video Viral
दरम्यान हा धक्कादायक व्हायरल व्हिडिओ @ghantagram_memes नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, पाटणा जंक्शनवर एक माणूस हातात बांबू घेऊन ट्रेनच्या काचा फोडताना दिसला असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “जोपर्यंत प्रहार स्वतःला होत नाही आणि स्वतःचे नुकसान होत नाही तोपर्यंत लोक काही करणार नाहीत”, तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “काय यार, याचे पार्ट्स विकूनही यातून झालेले नुकसान भरले जाणार नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मी विचार करत आहे की तिथले लोक नक्की काय करत आहेत”.