Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरुषांनाही रडू येत…! मनातील दुःख अश्रूंनी केलं व्यक्त, खांद्यावर जबाबदारीच्या बेड्या अन् रेल्वे स्टेशनवरचा तो Video Viral

Heart Touching Video : तो रडला, शांततेत व्यक्त झाला आणि पुढे गेला...! पुरुष कणखर असले तरी रडू त्यांनाही येतो, बोरिवली स्टेशनवरच्या त्या व्हिडिओने आता इंटरनेटवर सर्वांनाच भावुक केलं आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 20, 2025 | 10:23 AM
पुरुषांनाही रडू येत...! मनातील दुःख अश्रूंनी केलं व्यक्त, खांद्यावर जबाबदारीच्या बेड्या अन् रेल्वे स्टेशनवरचा तो Video Viral

पुरुषांनाही रडू येत...! मनातील दुःख अश्रूंनी केलं व्यक्त, खांद्यावर जबाबदारीच्या बेड्या अन् रेल्वे स्टेशनवरचा तो Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • बोरिवली स्टेशनवरचा भावनिक व्हिडिओ व्हायरल
  • पुरुषाला अश्रू झाले अनावर
  • व्हिडिओने युजर्सना केलं भावूक
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला थक्क करतात, कधी आश्चर्याचा धक्का देतात तर कधी भावूक करुन जातात. परिस्थितीनुसार, माणूस स्वत:ला कणखर बनवतो आणि आपले दु:ख मनातच दडवत राहतो. असं बोलतात की, एकवेळ स्त्री आपल्या अश्रूंतून मनाला हलकं करते पण एक पुरुष मात्र कधीही डोळ्यांतून अश्रू ढासळत नाही. पुरुष कधी रडत नसतात असे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण परिस्थितीला कंटाळून शेवटी एकाने आपले मन मोकळे केलेच… रेल्वे स्टेशनवरचा व्यक्तीचा भावनिक व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. यात त्याला अश्रू अनावर झाल्याचे दिसते, तो फार प्रयत्न करुन त्याचे हे दु:ख लपवण्याचा प्रयत्न करतो पण त्याचे डोळे त्याच्या निर्धारापुढे झुकतात आणि स्वत:ला मोकळे करतात.

वय गेलं पण उत्साह तितकाच कायम…! 80 वर्षांच्या आज्जाने अवकाशात उडी मारली लुटली स्कायडायव्हिंगची मजा; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

माहितीनुसार, इंटरनेटवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ मुंबईच्या बोरिवली रेल्वे स्टेशनवरचा असल्याचे म्हटले जात आहे. व्हिडिओमध्ये एक माणूस सीटवर बसलेला असतो, त्याने आपल्या चेहऱ्यावर हात ठेवलेला असतो आणि नकळतच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. आपलं दु:ख लपवण्यासाठी तो हाताचा आधार घेतो. व्यक्तीचे हे दु:ख आणि ते लपवण्यासाठी तो करत असलेली धडपड पाहून यूजर्स आता भावूक झाले आहेत. युजर्सने यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला असे कोणी दिसेल तेव्हा त्यांना विचारा की तुम्ही त्यांना मिठी मारू शकतो का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आपण रडतो, स्वतःला सावरतो आणि पुढे जात राहतो – कोणाच्याही मान्यतेची गरज नाही. आपल्याला माहित आहे की आपण बलवान आहोत”.

याचा व्हिडिओ @tilakdevdubey नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की, “आज मी बोरिवली येथे माझ्या ट्रेनची वाट पाहत होतो.प्लॅटफॉर्म जवळजवळ रिकामा आणि शांत होता. माझी ट्रेन नुकतीच चुकली होती आणि पुढची ट्रेन अर्धा तास दूर होती. म्हणून मी बसलो…आणि काही विखुरलेले जीवन पुढे जात आहे. काही वेळाने, मी माझ्या डावीकडे पाहतो, तिथे आणखी एक माणूस शांतपणे बसला आहे, त्याने आधीच चुकवलेल्या ट्रेनची वाट पाहत आहे… कदाचित वेळेपेक्षा मोठ्या कारणांसाठी. डोके खाली करा. डोळे भरून आले. तो रडत आहे…पण रडणाऱ्या लोकांना ते लक्षात येत नाही. हा शांत प्रकार आहे. जो लक्ष मागत नाही, फक्त सुटकेसाठी. क्षणभर मी माझी स्वतःची वाट पाहणे विसरतो. मी त्याच्याकडे जातो. विचारतो की तो ठीक आहे का… तो जास्त उत्तर देत नाही. फक्त म्हणतो, “बस याद आ गया कुछ… विचारल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.”
आणि मग पुन्हा शांतता”.

शिकाऱ्याचीच केली शिकार! नूडल्सप्रमाणे सापाला एका झटक्यातच गिळलं अन् किंग कोब्राच्या भयानक शिकारीचा Video Viral 

पुढे त्याने लिहिले आहे, “तो रिकाम्या रुळांकडे पाहतो, जणू तो कधीही येणार नाही अशा ट्रेनची वाट पाहत आहे, कदाचित एखाद्या गमावलेल्या व्यक्तीची, जी कधीही परत येणार नाही. मी मागे बसतो.जग मंद गतीने चालते. दिवे चमकतात. आणि मला फक्त एवढंच वाटतंय, माणसंही रडतात… पण शांततेत. ते कमकुवत असतात म्हणून नाही, तर कधीकधी शांतता हीच वेदना समजण्याची एकमेव भाषा असते. मी विश्वाला प्रार्थना करतोय, कृपया या माणसाच्या आयुष्यात आनंदाचा सर्वोत्तम मार्ग पाठवा…. मला हे पोस्ट करायचे नाही कारण हा त्याचा वैयक्तिक क्षण आहे. आणि मला काही करण्याचा अधिकार नाही… पण तरीही योग्य की अयोग्य हे जगाला माहित असायला हवे… (कदाचित मी काही दिवसांनी डिलीट करेन.)”

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video men crying in borivali railway station viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 10:18 AM

Topics:  

  • Indian Railway
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘मोदी, शाह की कब्र…’; JNU मध्ये डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची घोषणाबाजी, पहा Viral Video
1

‘मोदी, शाह की कब्र…’; JNU मध्ये डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची घोषणाबाजी, पहा Viral Video

चोरी करायला गेला, पण बाहेर पडायचा मार्गच हरवला; एक्झॉस्ट फॅनमध्ये अडकून चोराची झाली फजिती; मजेदार Video Viral
2

चोरी करायला गेला, पण बाहेर पडायचा मार्गच हरवला; एक्झॉस्ट फॅनमध्ये अडकून चोराची झाली फजिती; मजेदार Video Viral

Fact Check : चालू ट्रेनमधून बिबट्याने केली शिकार… दरवाजात उभ्या असलेल्या व्यक्तीला ओढतच काढलं बाहेर अन् थरारक Video Viral
3

Fact Check : चालू ट्रेनमधून बिबट्याने केली शिकार… दरवाजात उभ्या असलेल्या व्यक्तीला ओढतच काढलं बाहेर अन् थरारक Video Viral

धुरंधर चित्रपटातील ‘शरारात’ गाण्यावर पाकिस्तानी तरुणींनी थिरकवली कंबर… युजर्स म्हणाले, “यांना तर लाजाच नाहीत”; Video Viral
4

धुरंधर चित्रपटातील ‘शरारात’ गाण्यावर पाकिस्तानी तरुणींनी थिरकवली कंबर… युजर्स म्हणाले, “यांना तर लाजाच नाहीत”; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.