मुलावर तलवारीने हल्ला झालेला पाहताच हल्लेखोरांना भिडली आई, पहा कशी हल्लेखोरांची पळताभुई एक झाली
आई हे मायेचे प्रतीक असते. उगाच का स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हटले जात. नेहमी आपल्या मुलांच्या पाठीशी असलेली आई वेळ आली तर शैतानालाही धूळ चाखावू शकते, याचे उत्तम उदाहरण आजच्या या व्हायरल व्हिडिओतून दिसून येत आहे. सध्या एका रंगरागिणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एका आईने आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी हल्लेखोरांना पळवून लावल्याचे दिसून येत आहे. मोठ्या धैर्याने आपल्या मुलाचा जीव वाचवणाऱ्या या आईचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहायला हवा.
कोल्हापुरातील ही घटना असून या व्हायरल व्हिडिओतून दिसून आले की, एक व्यक्ती रस्त्याच्या बाजूला दुचाकीवर बसला होता. यावेळी त्याची आई त्याच्या बाजूला उभी होती आणि ते दोघेही आपल्या संभाषणात व्यस्त होते अशातच अचानक मागून तीन जण एका स्कुटीवर बसून त्याच्या समोर येतात आणि त्या व्यक्तीवर हल्ला करू पाहतात. यावेळी हल्लेखोर चक्क तलवार घेऊन व्यक्तीला मारण्यासाठी आलेले असतात. ते चपळतेने त्यांचे लक्ष नसताना त्या व्यक्तीवर तलवारीने हल्ला करतात मात्र व्यक्ती थोडक्यात यातून वाचतो.
A Man attacked the son, the mother ran after him with a stone in her hand, Mother chased away the goon for her son while risking her Own Life🫡, Kolhapur Maharashtra
pic.twitter.com/9DPnKNA3gC— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 19, 2024
हा सर्व प्रकार जवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आणि हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात असे दिसून येते की, आपल्या मुलावर हल्ला झालेला पाहताच आई तात्काळ जावळीत एक दगड उचलून हल्लेखोरांना मारण्याचा प्रयत्न करते. यांनतर हल्लेखोर घाबरून घटनास्थळावरून पळून जातात. याचा व्हिडिओ @Ghar Ke Kalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून यावर अनेकांनी कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “या खोट्या जगात आई ही एकमेव तारणहार आहे.”
हेदेखील वाचा – अरेच्चा! अवकाशात विमानाच्या मागे लागले एलियन्स? पायलटचाही उडाला थरकाप, Video Viral
सदर घटना फार धक्कादायक असून यावर आता कायदेशीररित्या कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीच हल्लेखोरांसोबत भांडण झालं होत. या भांडणातूनच हा हल्ला करण्यात आला होता. हल्ला झाला तेव्हा व्यक्तीचे वडील बाहेरगावी होते.