अवकाशात अनेक रहस्यमयी गोष्टी घडत असल्याचे समोर येत असते. यात अनेकदा यूएफओचे नाव समोर येते. तुम्ही अनेकदा यूएफओच्या गोष्टी ऐकल्या असतील. यांच्या प्रतिमा आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर शेअर होत असतात. मानवी जगापासून दूर अवकाशात त्यांचे वास्तव असल्याचे म्हटले जाते. मात्र यामागचे सत्य आजवर उलगडले गेले नाही. अनेकजणांनी यूएफओ किंवा एलियन्स पाहण्याचा दावा केला आहे मात्र याबाबत कोणताही ठोस पुरावा कोणी सादर करू शकलं नाही. सध्या असाच एक नवीन दावा समोर आला आहे, ज्यात एका विमानाच्या पायलटने चक्क एलियन्सना पाहण्याचा दावा केला आहे.
अलीकडेच एका पायलटने अवकाशात काही रहस्यमयी गोष्टी पहिल्याच दावा केला आहे. ते यूएफओ असून एलियन्स आपला पाठलाग करत होते, असा अंदाज त्याने वर्तवला आहे. त्याने याचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जो तुफान व्हायरल होत आहे. बोइंग 747 या विमातून हे दृश्य दिसले. हे विमान सौदी अरेबियातील जेद्दाहून नायजेरियातील अबुजाला जात होते. न्यूयॉर्क पोस्टनुसार कॅप्टन रुड व्हॅन पंगेमनन नावाचा अनुभवी पायलट आणि व्लॉगर या फ्लाइटमध्ये होता. पहाटे पाच वाजताच्या सुमारास त्यांनी आकाशात हे दृश्य पहिले.
हेदेखील वाचा – चंद्र दूर की दिल्ली? विद्यार्थ्याचे भन्नाट उत्तर; शिक्षकाला बसला धक्का…व्हिडिओ व्हायरल
कॅप्टनच्या म्हणण्यानुसार, अवकाशात ताऱ्यांसारख्या दिसणाऱ्या काही वस्तू नाचत असल्याचे त्याच्या दिसले. या वस्तू कधी वरच्या तर कधी खालच्या दिशेला फिरत होत्या. नंतर त्या पुन्हा त्यांच्या मूळ उंचीवर उडताना दिसल्या. हे सर्व दृश्य पाहून कॅप्टन फार घाबरले, कारण या गोष्टी फार विचित्र दिसत होत्या.
कॅप्टनने सांगितले की, त्याने याआधीही अनेकवेळा असा प्रकाश पाहिला होता. पण ते बघून हे सगळे काय आहे ते त्यांना समजत नव्हते. कॅप्टन रुड व्हॅनने आपल्या सह-वैमानिकाला ते दाखवले आणि ते काय आहे ते विचारले, परंतु त्यालाही ते समजले नाही. कॅप्टन आणि को-पायलट यांना त्यांच्या कामाचा खूप अनुभव आहे, त्यामुळे त्यांना माहित आहे की ही काही सामान्य गोष्ट नव्हती. ही गोष्ट पाहून कॅप्टन आणि त्याचा साथीदार खूप दोघेही फार घाबरले.
दरम्यान याचा एक व्हिडिओ विमानाच्या कॅप्टनने आपल्या युट्युब अकाउंटवर शेअर केलाआहे ज्यावर अनेक युजर्सने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले, “याबद्दल कॅप्टन रुड आणि क्रूचे धन्यवाद. ते दिवस गेले जेव्हा एअरलाइन पायलट आणि क्रू यांना आकाशातील असामान्य वस्तूंची तक्रार करण्याबद्दल गप्प बसावे लागते. या गोष्टी वास्तविक आहेत आणि त्यांचा अहवाल दिल्यास त्या सर्वात जास्त प्रचलित असलेल्या ठिकाणी कमीत कमी प्लॉट करण्यात मदत होऊ शकते. यामुळे इतरांना सावध राहण्याची सूचना मिळते.”