Viral video man eating roti with alcohol video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-वचित्र व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. दारु पिणाऱ्यांचे तर अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. दारुच्या नशेत माणूस कधी काय करेल याचा नेम नाही. कधी दारुच्या नशेत विजेच्या खांबावर जाऊन चढणे, तर कधी एखाद्या प्राण्याबरोबर बोलणे. कधी शायरी करणे असे अनेक पराक्रम लोक दारुच्या नशेत करतात. अनेकदा यांच्यावर हसावे का रडावे कळत नाही. सध्या असाच एका दारुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ पाहून अनेकांनी कपाळाला हात लावला आहे. दारु पिताना व्यक्ती त्यामध्ये सोडा टाकून पितो, तर कोणी बिना सोड्याचा. पण या पठ्ठ्याने दारुत चपाची बुडवून खाल्ली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. असा पराक्रम पाहून अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती दारुचा ग्लास घेऊन बसलेला आहे. त्याचा ग्लास पूर्णपणे भरलेला आहे. त्याच्या आसपास दारुसोबत खाल्ला जाणारे सामान दिसत आहे. दारु पिणाऱ्या व्यक्तीच्या हाता एक चपाती आहे. तो चपातीला गोल गुंडाळतो आणि दारुत बुडवून खातो. याचा व्हिडिओ तिथेच बसलेला एक व्यक्ती रेकॉर्ड करत असतो. दारुत चपाती बुडवून खाणार कॅमेरात दाखवून दाखवून खात असतो. याच वेळी बॅकग्रांडमध्ये एक बिहारी गाणे वाजत असते. यावरुन लक्षात येते की, हा व्हिडिओ बिहारमधील आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @studentgyaan या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. एका युजरने “हे फक्त बिहारीच करु शकतो” असे म्हटले आहे. दुसऱ्या एकाने हा बिहारी आहे, लाला असे म्हटले आहे. तर अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.