अनोखं ऑपरेशन सिंदूर! नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत पकडलं अन् ...; पाहा पुढे काय घडलं, Video Viral (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलीकडच्या काळात कपल्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायाल मिळत आहे. अलीकडे धोका देण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कुठे नवर-बायकोचे एक्सट्रा मॅरेटियल अफैरच्या घटना समोर येत आहेत. तर कुठे एकमेकांचा प्रियकराच्या जीव घेतल्याच्या घटना, तर कुठे प्रेयसीचा हुंड्यासाठी छळ केल्याच्या घटना समोर येत आहेत.
सध्या असाच एक धक्क्दायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका नवऱ्याने आपल्या पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं आणि त्यानंतर जे केलं धक्कादायक आहे. व्हिडिओ पाहताना सर्व टीव्हीच्या सिरियल ड्रामासारखे वाटत आहे. यामध्ये नवऱ्याने बायकोला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले आणि नंतर त्याने बायकोचे सिंदूर पाण्याने पुसून टाकले आहे. यापूर्वी देखील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये नवऱ्याने बायकोचे प्रियकरासोबत लग्न लावून दिले होते.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरा बायकोला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडतो. तुम्ही पाहू शकता की, एका गाडीतून नवरा आपल्या बायकोला आणि तिच्या प्रियकराला बाहेर काढत आहे. यानंतर नवरा बायकोचे कुंकु पाण्याने धुवून पुसून टाकतो. कोणत्याही प्रकारची हाणामारी, आराडाओरडा तो करत नाही. उलट बायकोच्या कपाळावरील कुंकु पुसतो. नंतर तिच्या प्रियकराच्या हातात कुंकु देतो आणि महिलेच्या कपाळावर लावायला सांगतो. नवरा थेट त्यांचे ल्गन लावून देतो. हा सर्व प्रकार तेथीलच एक व्यक्ती कॅमेरात शूट करत असतो. तुम्ही पाहू शकता की महिला आपले तोंड लपवण्याचा प्रयत्न करत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Extra-Marital affair Kalesh (Husband Caught his wife with someone else’s, Gave perfect treatment 🫡)
pic.twitter.com/nOSj99ysEX— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 21, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. एका युजरने “दुसऱ्या लग्नाचा खर्च वाचला” असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने अलीकडे अशा घटना जास्त वाढल्या आहेत असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने काय काय पाहावे लागतंय आजकाल, असे वाटतंय चित्रपट चालू आहे समोर. अशा विविध प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.