Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सीएमला पाहायला नाही तर मासे लुटायला आली होती लोकं, नितीश कुमारांच्या कार्यक्रमात माशांची लूट, Video Viral

अलीकडेच बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र नितीश कुमार यांचे कार्यक्रमातून जाताच लोकांनी प्रदर्शनात ठेवलेल्या माशांवर हल्ला केला आणि हे मासे लुटायला सुरुवात केली. या सर्व प्रकारामुळे तिथे एकच गोंधळ माजला. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही युवकांनी सांगितले क ते तिथे नितीश कुमार यांना पाहण्यासाठी नाही तर हेलिकॉप्टर पाहण्यासाठी आणि मासे लुटण्यासाठी आले होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 21, 2024 | 01:42 PM
सीएमला पाहायला नाही तर मासे लुटायला आली होती लोकं, नितीश कुमारांच्या कार्यक्रमात माशांची लूट, Video Viral

सीएमला पाहायला नाही तर मासे लुटायला आली होती लोकं, नितीश कुमारांच्या कार्यक्रमात माशांची लूट, Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते. यातील अनेक व्हिडिओ हे हास्यास्पद असतात तर काही आश्चर्याचा धक्का देणारे… सध्या नीतीश कुमार यांच्या कार्मक्रमातील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नितीश कुमार कार्यक्रमातून निघताच लोकांनी प्रदर्शनात ठेवलेल्या माशांवर हल्ला केला आणि हे मासे लुटायला सुरुवात केली. लोकांनी अक्षरशः उडी मारत, एकमेकांसोबत धक्काबुक्की करत हे मासे लुटण्याचा प्रयत्न केला. यानंतर या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ शेअर झाल्याच्या काही क्षणातच व्हायरल झाला आहे. आता नक्की काय घडले याविषयी जाणून घेऊयात.

काय प्रकरण आहे?

बिहारच्या सहरसा जिल्ह्यातून मासे लुटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार एका कार्यक्रमात गेल्याचे सांगण्यात येत आहे. कार्यक्रम संपला आणि नितीश कुमार तेथून निघून गेल्यावर तिथे उपस्थित लोकांनी प्रदर्शनात ठेवलेले मासे धक्काबुक्की करत लुटले. यानंतर तेथे प्रचंड गोंधळ उडाला. व्हायरल व्हिडिओमध्ये लोक बायोफ्लॉक टाकीत उडी मारून सर्व मासे लुटताना दिसत होते.

हेदेखील वाचा – तवा सापडला नाही म्हणून चाटवाल्या भैयांनी वापरला अनोखा जुगाड, पाहून तुमचेही डोकं चक्रावेल, पाहा Viral Video

मिळालेल्या माहितीनुसार, 20 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार सहरसा दौऱ्यावर पोहचले, जिथे त्यांनी सर्वप्रथम दिवारीतील माँ विषहरी मंदिराचे उद्घाटन केले आणि प्रार्थना केली. यानंतर ते अमरपूरला पोहोचले, जिथे विविध विभागांनी प्रदर्शनांचे आयोजन केले होते, ज्याची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. या प्रदर्शनात मत्स्यव्यवसाय विभागातर्फे बायो फ्लॉक लावण्यात आले असून, त्यात अनेक मासे पोहत होते. पाहणीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार पटनाला रवाना झाले. ते निघून जाताच तिथे मासे लुटण्यासाठी गोंधळ सुरु झाला. यावेळी अनेकजण मासे लुटण्यासाठी बायो-फ्लॉकच्या आत शिरले आणि पाण्यातून ,मासे बाहेर काढू लागले.

‘सीएम को देखने नहीं, मछली लेने आए थे’, नीतीश कुमार के कार्यक्रम में मच गई लूट, सामने आए Video pic.twitter.com/Q1aUYIO1Vf — Deepak Pandey (@deepakpandeynn) September 20, 2024

हेदेखील वाचा – पतीबरोबरच्या वादात होत्याच नव्हतं करून बसली पत्नी, रागात मारली तलावात उडी अन् मग… Video Viral

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, तेथे उपस्थित असलेल्या एका तरुणाने सांगितले की, ते नितीश कुमार यांना भेटण्यासाठी नव्हे तर मासे पकडण्यासाठी आले होते. त्यांनी सांगितले की, ते हेलिकॉप्टर पाहण्यासाठी आणि मासे घेण्यासाठी कार्यक्रमात सामील झाले होते. ही घटना काही लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली, जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, जिल्हा मत्स्यव्यवसाय अधिकारी सुबोध कुमार सांगतात की, हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांसाठी आयोजित करण्यात आला होता, मात्र यासाठी त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले.

Web Title: Viral video people loot fish in nitish kumars program video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2024 | 01:41 PM

Topics:  

  • bihar
  • Nitish Kumar
  • viral video

संबंधित बातम्या

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
1

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल
2

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल

कलियुगातील ‘श्रावणबाळ’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral
3

कलियुगातील ‘श्रावणबाळ’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क
4

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.