सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात. तर काही आश्चर्याचा धक्का देऊन जातात. यात अनेकदा काही हटके आणि अनोखे जुगाडदेखील व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ‘चाट वाला भैय्या’ने आपल्या कलेची अशी जादू दाखवली आहे की लोक अवाक् झाले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चाट वाले भैय्या पावभाजी बनवताना दिसत आहेत. मात्र ते तव्यावर किंवा कोणत्या कढईवर नाही तर अशा गोष्टीवर चाट बनवत आहेत की पाहूनच तुमचे डोकं चक्रवायला लागेल. या व्हिडिओमध्ये एक चाट विक्रेता चक्क डीटीएचवर भाजी बनवताना दिसत आहे. याचा व्हिडिओ पाहून आता अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. या व्हिडिओला यूजर्सना खूप पसंती मिळत असून लोक या व्हिडिओची फार मजा घेत आहेत.
हेदेखील वाचा – पतीबरोबरच्या वादात होत्याच नव्हतं करून बसली पत्नी, रागात मारली तलावात उडी अन् मग… Video Viral
सोशल मीडियावर असे जुगाडाचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. मात्र डीटीएचवर भाजी बनवणाऱ्या विक्रेत्याचा व्हिडिओ पाहून मुळातच कधी पाहिला असावा. अनेक लोक हा व्हिडिओ पाहून याची मजा घेत आहेत तर काहीजण या व्हिडिओचा निषेध करत आहेत. खाण्यापिण्याच्या बाबतीत केले जाणारे हे विचित्र जुगाड जीवावर बेतू शकतात. यामुळे आपल्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. आम्ही या व्हिडिओचे अजिबात समर्थन करत नाही.
हेदेखील वाचा – ‘रिझर्वेशन आहे तर सीट घरी घेऊन जाशील का?’ रेल्वेमध्ये सीटवरून दोन तरूणांमध्ये राडा
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @kushka.hakla नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला गेला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1.32 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावरूनच आपल्याला याचा अंदाज मिळतो की, लोकांना हा व्हिडिओ किती आवडला आहे. या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया कमेंट्सच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, यूजरने लिहिले आहे की, “हा भारत आहे, जुगाडशिवाय येथे कोणतेही काम होत नाही.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तरीच मी विचार करत आहे मला सिग्नल का येत नाहीये.”