आता एवढंच बघायचे राहिले होते! व्यक्तीने शिकंजीसोबत 'असा' एक्सपिरीमेंट केला; पाहून खाद्यप्रेमी संतापले म्हणाले...
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, जुगाड, स्टंट, भांडण तसेच लग्नासंबंधित असे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तसेच याशिवाय खाद्यपदार्थांचे रेसिपी, तसेच फेमस ठिकाणांचे देखील व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या खाण्याच्या पदार्थांवर वेगवेळे प्रयोग करण्याचा ट्रेंड झपाट्याने सोशल मीडियावर लोकप्रिय होत चालला आहे.
सोशल मीडियावर अशा अनेक विचित्र फूड कॉम्बिनेशनचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. नुकतेच सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एका व्यक्तीने असे शिकंजी सोबत असे काही केले आहे की, पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. तसेच खाद्यप्रेमींनी या व्हिडिओनवर आपला संताप व्यक्त केला आहे. तर काहींना असा विचित्र प्रयोग पाहून हसू आवरणे कठीण झाले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
शिकंजी मध्ये चक्क विमल मसाला पान
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक रोड साइड विक्रेता “स्पेशल शिकंजी” बनवताना दिसत आहे. तो शिकंजी बनवण्यासाठी तो पाणी, लिंबू, अदरक, पुदीना वापरतो. त्यानंतर तो त्यामध्ये चक्क विमल मसाला पान टाकतो. ही “फेमस” शिकंजी तो ग्राहकांना विकतो. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही. मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकजणांना हा व्हिडिओ पाहून धक्का बसला आहे. विशेष करुन खाद्यप्रेमींनी.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असेलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @viral_brijesh_vlogs या अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिल आहे की, स्पेशल विमल पान मसाला शिकंजी. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच अनेकांनी याला अप्रतिम म्हटले आहे. एका युजरने म्हटले आहे की, आता एवढेच बाकी राहिले होते. तर एका युजरने म्हटले आहे की, भारीच आता विमल खाणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. आणकी एका युजरपने म्हटले आहे की, भाऊ, काय प्रकार आहे हा? कोणी गुलाबजाम पराठा बनवतेय, तर कोणी गुलाबाचे वडे तळतेय काय चाललंय काय असे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.