83 लाख पगार तरीही भागत नाहीयेत गरजा, कॅनडात राहणाऱ्या भारतीय तरुणाने व्यक्त केली व्यथा, Video Viral
प्रत्येकजण आपल्या आयुष्यात चांगला पगार, चांगले घर आणि सुंदर जोडीदार शोधत असतो. या तीन गोष्टी मिळाल्यानंतर माणसाला इतर कशाचीही गरज भासत नाही. चांगल्या जीवनशैलीच्या शोधात लोक अनेकदा देश सोडून दुसऱ्या देशात स्थायिक होतात. भारतातूनही बरेच लोक चांगल्या पगाराच्या आशेने कॅनडा आणि इतर युरोपीय देशांमध्ये स्थायिक होतात. पण प्रत्येक वेळी गोष्टी आपल्याला वाटतात तशा घडत नाहीत.
एका भारतीय व्यक्तीला कॅनडामध्ये 83 लाख रुपये कमी पगार वाटत आहे. अनेकांना आपल्या संपूर्ण जीवनात जितके पैसे कमवणे शक्य होत नाही तितके पैसे हा व्यक्ती एका वर्षात कमवत आहे मात्र तरीही त्याला हे पैसे कमी पडत आहेत. सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओ मोठ्या वेगाने व्हायरल होत आहे. व्यक्तीने जे व्हिडिओत सांगितले ते ऐकून आता अनेकजण थक्क झाले आहेत.
हेदेखील वाचा – Video Viral: “लोक म्हणतात बाईच्या डोक्यावर …” तरुणीची पाटी चर्चेत, कमेंट्समध्ये लोकांच्या हिंसक प्रतिक्रया व्यक्त
अलीकडेच, कॅनडामधील भारतीय वंशाच्या एका कंटेंट क्रिएटरने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये एक भारतीय माणूस असे म्हणत आहे की, टोरंटोसारख्या शहरात 83 लाख रुपये पुरेसे वाटत नाहीत. ही व्यक्ती टेक प्रोफेशनल आहे आणि कॅमेऱ्यावर त्याच्या कामाबद्दल बोलत आहे. ते म्हणतात की टोरंटोमध्ये टिकण्यासाठी वर्षाला 83 लाख रुपये पुरेसे नाहीत. त्याला दरवर्षी 1 लाख डॉलर्स पगार मिळतो, जे भारतीय रुपयांमध्ये सुमारे 83 लाख रुपयांच्या सामान आहे. या तरुणाने पुढे सांगितले की, डाउनटाउनमध्ये राहणे इतर भागात राहण्यापेक्षा महाग आहे. मी 3000 डॉलर भाडे देतो जे सुमारे 2.5 लाख रुपयांच्या सामान आहे. याशिवाय, आजकाल 1 लाख डॉलर्सचा पगारही पुरेसा नाही आणि मी माझ्या पगारावर खूश नाही.
हेदेखील वाचा – ‘महाभारत’च्या टायटल सॉंगवर केला चिमुकलींनी डान्स, चेहऱ्यावरील हावभाव अन् अद्भुत नृत्य पाहून अंगावर शहारे येतील
तरुणाच्या या सर्व गोष्टी ऐकून आता व्हिडिओ क्रिएटरसह युजर्सदेखील आवाक् झाले आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करताच वेगाने व्हायरल झाला आहे. @salaryscale नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला अहे . व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे… कॅनडातील टोरंटो येथे SAP स्पेशालिस्ट म्हणून 1 लाख 15 हजार डॉलर्सच्या वार्षिक पगारावर भाऊ समाधानी नाही. व्हिडिओवर अनेक युजरने कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या. एका युजरने लिहिले, “तो बरोबर आहे. यूकेमध्येही तीच कथा आहे. एका जोडप्यासाठी, दोघे काम करेपर्यंत, जास्त बचत होत नाही”. तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भारतात ये आणि 35,000 रुपये पगारामध्ये आनंदी रहा. “