सोशल मीडियावर नेहमीच अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओज आपल्याला पोट धरून हसवतात तर काही थक्क करून जातात. तसेच काही व्हिडिओ तर असे असतात की ज्यांना पाहून आपल्या अंगावर थेट काटाच यायला लागतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील स्टेजवरील मुलींचा जबरदस्त डान्स आणि मन वेधणारे हावभाव पाहून अनेकजण आवाक् झाले आहेत. हा व्हिडिओ अनेकजण मोठ्या प्रमाणात शेअर करत आहे आणि या व्हिडिओजचा आनंद लुटत आहेत. या व्हिडिओत काय खास आहे ते जाणून घेऊयात.
या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेजवर काही चिमुकल्या मुलींचा ग्रुप दिसेल. हा ग्रुप स्टेजवर एक नृत्य सादर करत आहे. नृत्य सादर करताना त्यांनी लाल सलवार परिधान करून केसामध्ये गजरा माळला आहे. या सांस्कृतिक पेशात सर्वच मुली फार सुंदर आणि मनमोहक दिसत आहेत. त्या महाभारताच्या टायटल सॉंगवर नृत्य सादर करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरचे हावभाव इतके मार्मिक आहेत की ते तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. गाण्याचे लिरीक्स व त्यांच्या डान्स स्टेप्स पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील. त्यांचा डान्स तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहावा, असे वाटेल.
हेदेखील वाचा – 8 रुपयाला शाही पनीर, 5 रुपयाला दाल तडका! हॉटेलचे बिल होत आहे Viral, किमती पाहून चक्रावाल
चिमुकलींचा हा सुंदर डान्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकजण त्यांच्या या नृत्याचे कौतुक करत आहेत. त्यांच्या या जबरदस्त डान्सचा व्हिडिओ @dance.esha.dance नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, “है कथा संग्राम की” असे लिहिण्यात आले आहे.
हेदेखील वाचा – Viral Photo: सॅलडच्या पिशवीतून बाहेर पडला भयावह जीव, फोटो पाहून अचंबित व्हाल
हा व्हिडिओ शेअर करताच सोशल मीडियावर फार वेगाने व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर युजर्सचा कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. अनेकांनी कमेंट्समध्ये या व्हिडिओवर आपले मत मांडले आहेत. एका युजरने लिहिले आहे, “खूप छान पद्धतीने मुलींना हा डान्स शिकवला. व्हिडीओ पाहून छान वाटले.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, अतिशय सुंदर कोरिओग्राफी.. मला खूप आवडलं.. खूप दमदार अभिनय.. कृष्ण तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.. राधे राधे. तर आणखीन एका युजरने लिहिले की, अंगावर शहारे आले, काय परफॉर्मन्स आहे”.