Viral video thief snachets phone from young girl dragging her to street ludhiyana video goes viral
सोशल मीडियावर रोज दर सेकंदाला लाखो व्हिडिओ आपल्याला पाहयाला मिळतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय ने अपघातांचे, चोरीच्या घटनांचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अलीकडे चोरीच्या घटनांमध्ये तर मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोर दिवसाढवळ्या देखील चोरी करत आहेत. अगदी कसलही भिती न बाळगता लोकांच्या घरात देखील घुसतात.
सध्या असाच एक दिवसाढवळ्या चोरीच्या संतापजनक प्रकार समोर आला असून याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोन चोरणाऱ्यांची दहशत वाढली असून यामुळे अनेकांना गंभीर दुखापत देखील झाली आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ देकील चोरीच्या घटनेशी संबंधित आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही घटना लुधियनामध्ये घडली असून यामध्ये एका तरुणीला गंभीर दुखापत झाली आहे.
नेमकं काय घडलं?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील घटना 26 जानेवारी रोजी लुधियानत घडलेली आहे. यामध्ये एक तरुणी रोज गार्डनवरुन चालली असताना अचानक एक बाईकस्वार मागे आला आणि तिचा हातातला फोन हिसकावून घेऊन गेला आहे. फोन वाचवण्यासाठी तरुणीने फोन धरुन ठेवण्यासाठी जिवापाड प्रयत्न केले. पण दुचाकीस्वार एवढ्या वेगात होता की तो फोनसोबत त्या तरुणीला देखील फरपटत घेऊन गेला. यावेळी तिचे डोके गाडीच्या चाकाला जोरात आदळले. काही लोक तिच्या मदतीसाठी पुढे आले तसेच चोराल देखील पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो तिथून पळून गेला.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हाायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @1000thingsinludhiana या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. लुधियानातील एका दुकानाच्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली असून याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओपाहून अनेकजणांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने स्नॅचर्स खूप वाढत चालले आहेत असे म्हटले आहे. तर आणखी एकाने लोक त्यांच्या घरासमोरही सुरक्षित नाहीत. प्रशासन काय करतंय? असे म्हटले आहे. तर नेकांनी त्या मुलीबद्दल काळजी व्यक्त केली आहे. अशा चोरांना पकडून असंच फरपटत नेलं पाहिजे असेही लोकांनी म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.