पुणे तिथे काय उणे! भर रस्त्यातच महिलांचा राडा; लोक हॉर्न वाजवत राहिले पण...; VIDEO तुफान व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. भांडणाचे कर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये पुण्याधील भांडणांचे तर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ महिलांच्या भांडणाचा व्हडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये महिलांनी रस्त्याच्या मधोमधच भांडायला सुरुवात केली आहे. परंतु यामुळे वाहतूक अडकून पडली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन महिलांमध्ये रस्त्याच्या मधोमधच शाब्दिक वाद सुरु आहे. या महिला स्कूटीवर बसूनच वाद घालत आहेत. याच वेळी एक चारचाकी मागू येते. चालक हॉर्न वाजवत असतो पण या महिला काही हटण्याचे नाव घेत नाही. चारचाकी गाडी चालकाने ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद केली आहे. या दरम्यान तो हॉर्न वाजवत राहिला आहे. तुम्ही पाहू शकता की, एक महिलेच्या स्कूटीवर चिमुकला बसलेला दिसत आहे. महिलांमुळे तिथून येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होत आहे, मात्र महिलांनी हॉर्नकडे देखील दुर्लक्ष केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 3 एप्रिल रोजी पुणेच्या चिंचेची तालीम जवळ घडली. स्कूटीवर (डाव्या बाजूला) असलेल्या काकूंना चिंचेच्या तालीम जवळील गणपतीच्या पाया पडायचे होते. यामुळे त्यांनी अचानक ब्रेक दाबला. याच वेळी मागून एक काकू येऊन त्यांना धडकल्या. यानंतर दोन्ही महिलांमध्ये शाब्दिक वाद सुरु झाला. पाय पडण्यासाठी थाबंवलेल्या काकूंचे म्हणणे होते की, चूक त्यांची असली तर दुसऱ्या काकूंनी त्यांची माफी मागावी. दोन्ही महिला दहा मिनिटे रस्त्यावर तशाच भांडत राहिल्या. यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जमा झाले होते. रस्त्यावरील सर्व लोक दोघींना पाहून एन्जॉय करत होते. काहीजण हॉर्न वाजवून थकले पण दोन्ही महिला भांडतच होत्या.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @shra1bhujbal या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून लोकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहे. एका युजरने म्हटले आहे की, त्यांना डिस्टर्ब करु नका, महत्वाचा विषय सुरु आहे. दुसऱ्या एकाने नळावरचे भांडण गाडीवर झाले असे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.