काका-काकुंचा भन्नाट डान्स
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. तुम्ही काका-काकुंना देखील भन्नाट गाण्यांवर भन्नाट डान्स करताना पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काका-काकुंनी गोविंदाच्या एका बॉलीवुड गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी व्हिडिओचा आनंद लुटला आहे. यांसारखे अनेक काका-काकुंच्या डान्सचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील पण हा व्हिडिओ काही हटकाच आहे. यावर अनेकांनी आपल्या भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गोविंदाच्या कूली नं 1 चित्रपटातील तुझको मिर्ची लगी तो में क्या करू गाणे सुरू आहे. सुरूवातीला काका-काकु मस्त तालामध्ये गोल फिरतात. मग गाणे चालू होताच काका डान्स करायला सुरूवात करतात. तर काकु त्यांच्याकडे बघत त्यांना कॉपी करत असतात. गाण्यांच्या बोलासोबत अगदी त्याला जुळतील अशा पद्धतीने डान्स स्टेप्स काका-काकू करत असतात. शेवट देखील भन्नाट आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहा. हा व्हिडिओ तुम्हाला देखील नक्की आवडेल.
हे देखील वाचा – अरेच्चा! सायकल चालवताना दिसलं माकड; व्हिडिओ होतोय व्हायरल
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इस्टाग्रामवर noolimnm या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. यावर अनेकांनी आपल्या भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ‘माझा मित्र लग्नानंतर त्याच्या बायकोसाबत असा डान्स करणार.’ तर आणखी एकाने म्हटले आहे की, मला वाटते काका-काकुंनी छान डान्स केला आहे. तसेच दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, यांचा डान्स पाहून मलाही जान्स करायची इच्छा झाली. हा व्हिडीओ अनेकांनी रिपोस्ट देखील केला आहे.
हे देखील वाचा- जीवघेणा स्टंट! तरुणाने टेकडीवर लटकत केला योगा; व्हिडिओ पाहून नेटकरी हादरले