viral video Uncle's amazing dance on the song Kajrare video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र, कधी भायवह अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. डान्स रिल्सचे तर अनेक भन्नाट व्हिडिओ पाहायला मिळतात. यामध्ये अगदी वयोवृद्ध लोक देखील भन्नाट अशा एक्सप्रेशन आणि स्टेप्ससह डान्स करत असतात. सध्या असाच एक वयोवृद्ध काकांच्या डान्सचा भन्नाट असा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधले आहे. यामध्ये एक काका ऐश्वर्या रायच्या कजरारे गाण्यावर अतिशय सुंदर असे हावभाव देत डान्स करत आहे. त्यांचा हा डान्स नेटकऱ्यांच्या अत्यंत पसंतीस पडत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नाचे मंडप दिसत आहे. वर-वधू स्टेजवर बसलेले आहेत. त्यांच्यासोबत अनेक पाहुणे मंडळी देखील उपस्थित आहेत. बहुतेक संगीत कार्यक्रम सुरु आहे. येथेच स्टेजच्या जवळ एक काका अत्यंत भन्नाट अशा हावभावांसह डान्स करत आहेत. बंटी और बबली या चित्रपटातील कजरारे गाण्यावर काकांनी भन्नाट डान्स केला आहे. त्यांचे हावभाव, डान्स स्टेप्स अत्यंत उत्कृष्ट आहेत. काकांनी त्यांच्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधले आहे. काका डान्स आनंद घेत आहेत. त्यांनी आपल्या नृत्याने अनेकांचे मन जिंकले आहे. सध्या हा व्हिडिओ पाकिस्तानमधील असल्याचे म्हटले जात आहे, परंतु अद्याप याची पुष्टी झालेली नाही. हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @engnr_abdullah या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहे. अनेकांनी काकांच्या डान्ससमोर ऐश्वर्या रायपण फेल असे म्हटले आहे. एका युजरने जेव्हा जावई हुंडा घेत नाही तेव्हा असे म्हटले आहे. दुसऱ्या एका युजरने किती छान डान्स केला काकांनी असे म्हटले आहे, तर तिसऱ्या एका युजरेन काकांचा नाद नाय असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.