Viral video Young man dancing on middle of road video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेसीर तर कधी चित्र-विचित्र असे व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड, भांडण यांशिवाय अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. तुम्ही अनेक रस्ते अपघातांचे व्हिडिओ देखील पाहिले असतील. अनेकदा इतके गंभीर आणि अंगावर काटा आणणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एका व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. खरं तरं या व्हिडिओतून आपला निष्काळजीपण किती महागांत पडू शकतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे मात्र हा व्हिडिओ तुम्हाला हसवल्याशिवायही राहणार नाही.
नेमकं काय घडलं?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस रस्त्याच्या बाजूला आपली बाईक लावून उभा आहे.इतक्यात तो रस्त्याच्या मधोमध विचित्र जान्स करायला लागतो. आजूबाजूचे कसलेही भान न ठेवता बेधुंद होऊनतो नाचत असतो. इतक्यात मागून एक बाईक येते आणि त्याला धडकते. डान्स करणार तरुण आणि बाईकस्वार दोघेङी खाली पडतात. सुदैवाने त्याला कोणती गंबीर दुखापत होत नाही. पण तरुण पुन्हा उठून तसेच विचित्रासारखा डान्स करायला लागतो. त्यानंतचर देखील आणखी एक बाईक येते आणि त्याला उडवते. तरीही त्याला याचे गांभीर्य येते नाही. त्याच्या या चुकीमुळे अनर्थ घडू शकतो हे त्याच्या लक्षातच येत नाही. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील हसावे की राडावे हे कळणार नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @autohelpermarathi या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘मोर उडाला राव’ असे लिहिले आहे. लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देताना हसण्याचे इमोजी शेअर केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, हा मोर कसा काय उडायला लागला, तर दुसऱ्या एका युजरनेमोरामुळे बाईकवाल्याचं तोंड फुटलं असे म्हटले आहे. आणखी एका युजरने ‘पंछी बनू उडता फिरु मस्त गगन में’ असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सद्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण असे विचित्र कृत्य रस्त्याच्या मधोमध करणे महागात पडू शकते.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.