viral video Young man slept front of moving train for reel stunt video goes viral
अलीकडच्या काळात सोशल मीडिया फेमस होण्यासाठी, लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटचे प्रमाण अत्यंत वाढत चालले आहे. विशेषत: तरुणाईमध्ये स्टंटचे वाढते प्रमाण हे धोकादायक ठरत आहे. प्रसिद्ध मिळवण्यासाठी काही तरुण नको त्या थराला जाण्यास देखील मागचा पुढचा विचार करत नाहीत. अनेकदा यामुळे बऱ्याच लोकांनी आपला जीव देखील गमावला आहे. सध्या असाच एक मुर्खपणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या वेगाने व्हायरल होत आहे. एका तरुणाने रिलसाठी धावत्या ट्रेन खाली झोपण्याचा प्रयत्न केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रेल्वे रुळाचा परिसर दिसत आहे. तिथेच दोन तरुण देखील उभे आहेत. यातील एक तरुणाच्या हातात मोबाईल आहे. तर दुसरा तरुण पटरीवर उभा आहे. दरम्यान पटरीवर उभा असलेला तरुण रेल्वेरुळावरुन ट्रेन येण्याच्या काही मिनिटं आधी झोपतो. तर दुसरा तरुण हे सर्व दृश्य मोबाईलच्या कॅमेरात कैद करत असतो. त्याच वेळी एक ट्रेन पटीवर झापलेल्या तरुणाच्या अंगावरुन जलद गतीने जाते. ट्रेन एवढ्या वेगात असते की, जर चुकून जरी त्याला धडकून गेली असते तर तरुणाचा जागीच मृत्यू झाला असता. ट्रेन गेल्यावर तरुण अगदी बिनधास्तपणे हसत उभा राहतो, त्याच्यासोबत किती दुर्दैवी अपघात घडला असता याचे काहीच वाटत नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @mr_deepak_raj_135dk या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. मात्र, हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. यापूर्वी देखील असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहे. कोणी ट्रेनसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न तरत आहे तर कोणी धावत्या ट्रेनमध्ये चढत आहे. कोणी तोंडाला ग्लू लावत आहे तर कोणी बाईकवर उभे राहून स्टंट करत आहेत. असे अनेक स्टंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.