(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर या लग्नसमारंभाचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून यात नक्की काय घडलं ते सविस्तररित्या आपण जाणून घेणार आहोत. व्हायरल होत असलेला हा लग्नसमारंभ कधी आणि कुठे पार पडला याची माहिती अद्याप समोर आली नाहीये पण यातील दृष्यांनी सर्वांना हसू अनावर केलं आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, हिंदू विधींनुसार वर आणि वधू अग्नीकुंडाच्या भोवती सात फेरे घेत आहेत. वर पुढे चालत असतो तर त्याचा हात धरुन वधू त्याचा मागून चालत असते. या फेऱ्यांवेळीच वधूचा पाय चुकून वराच्या धोतीवर पडतो ज्यानंतर भरमंडपात त्यांची संपूर्ण धोती सुटते आणि तो अर्धनग्न होते. वरासोबत घडलेली ही गोष्ट लाजीरवाणी तर होतीच पण यामुळे उपस्थितांना आणि वधूला आपले हसू आवरताच येत नाही.
वादळाचे भीषण रुप! बरेलीत पत्र्याच्या शेडसह माणूस हवेतच गेला उडून… घटनेचा थरारक VIDEO आला समोर
व्हिडिओत वर लगेच आपली धोती बांधून परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करतो आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो. लग्नाचे अनेक व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील पण या हास्यास्पद दृष्यांनी मात्र यूजर्सना हसून हसून वेड लावलं आहे. घटनेचा व्हिडिओ @anindian.in नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत लग्नसमारंभातील या हास्यास्पद घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “त्यांना हे लग्न नेहमीच लक्षात राहिल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा व्हिडिओ शेअर करण्याची काहीच गरज नव्हती” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला आशा आहे की त्याने आत अंडरवेअर घातले असावे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






