(फोटो सौजन्य: X)
वादळाचे भीषण रुप! बरेलीत पत्र्याच्या शेडसह माणूस हवेतच गेला उडून… घटनेचा थरारक VIDEO आला समोर
काय घडलं व्हिडिओत?
सदर घटना ही महाराष्ट्राच्या बीड शहरातून समोर येत आहे. रस्त्यावरील CCTV फुटेजमुळे ही घटना उघडकीस आली. याच फुटेजला आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आलं आहे. यात संपूर्ण घटना घडताना आपण पाहू शकतो. व्हिडिओत दिसते की, ४ वर्षांचा चिमुकला त्याच्या घराजवळ असलेल्या मैदानात खेळत असते आणि याचवेळी अचानक कुत्र्यांच्या एक कळपाने त्याच्यावर हल्ला केला. माहितीुनुसार यात ६ कुत्र्यांचा समावेश असतो. सर्व कुत्रे मिळून रिंगण करुन त्याला पकडतात आणि चावत, खेचून तिला रस्त्यावर घेऊन जातात.
श्वानांच्या या हल्ल्याने चिमुकला घाबरतो आणि तो ढसाढसा रडायला सुरुवात करते. त्याचं रडणं ऐकूण व्हिडिओत एक व्यक्ती त्याच्या मदतीसाठी धाव घेताना दिसतो. व्यक्तीला येताना पाहून कुत्रे घाबरतात आणि गुपचूप तिथून आपला पळ काढतात. ही घटना बुधवारी घडून आल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले ज्यानंतर डाॅक्टरांनी त्याच्या शरीरावर ६-७ गंभीर जखमा असल्याचे स्पष्ट केले. मुलाला योग्य उपचार देण्यात आले असून त्याची प्रकृती आता सुधारली आहे.
Stray Dogs attack a 4 year old boy in Beed, Maharashtra. 6 stray dogs attacked and dragged the kid. Boy is in critical condition due to severe bite at multiple locations. But if anyone gets angry seeing it, they will be labelled as blood thirsty animal haters. pic.twitter.com/9QYDhAQWZE — Ankur Singh (@AnkurSingh) May 14, 2026
एक भयानक जेल जिथे महिलांची मुंडकी छाटून कैदी खेळतात फुटबाॅल, कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का?
या घटनेमुळे आता प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मागील अनेक महिन्यांपासून परिसरातील स्थानिकांनी रस्त्यावर वाढलेल्या भटक्या कुत्र्यांची तक्रार केली होती. पण नगरपालिकेने यावर कोणतीही कारवाई केली नाही. या घटनेमुळे आता पालकांना भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना @AnkurSingh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सने घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “त्या भटक्या कुत्र्यांना नाही, तर त्या पालकांना दोष द्या ज्यांनी ४ वर्षांच्या मुलाला मागे सोडले. कुत्रे हे कुत्रेच असतात”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जर ते माणसं आले नसते, तर त्या कुत्र्यांनी त्याला ठार मारलं असतं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ही समस्या टाळण्यासाठी सरकारने भटक्या कुत्र्यांना मूलभूत सुविधा असलेल्या निवारागृहांमध्ये हलवण्याची वेळ आली आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






