
ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकचा धडकली Thar, तितक्यात समोरून आला दुसरा ट्रक अन् जे घडलं... Video Viral
गाडी चालवताना रस्ते नियमांचे पालन करणे फार गरजेचे आहे अन्यथा अपघात घडून येऊ शकतो. अनेक चालक या नियमांकडे दुर्लक्ष करुन वाटेल तशी कार चालवतात आणि मग परीणामी भीषण अपघाताला बळी पडतात. आताच्या व्हिडिओमध्येही असेच काहीसे घडल्याचे दिसून आले आहे. घाईघाईत अनेकजण नियमांचे उल्लंघन करत ओव्हरटेकचा पर्याय निवडतात आणि इथेच त्यांची मोठी चूक होऊन बसते. आता हेच पाहा, लवकर जाण्याच्या नादात व्यक्तीने आपल्या थार कारला ओव्हरटेक करु पाहिलं आणि या नादात भीषण घटना घडून आली. याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून यात नक्की काय घडून आलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये दिसते की, थार चालक घाईघाईत ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतो पण तितक्यात समोरुन एक मोठा ट्रक येतो आणि याला थार कारची धडक बसते. यानंतर मागून एक आणखीन ट्रक त्यांच्या दिशेने येताना दिसतो पण ही घटना पाहून दूरच तो थांबतो. जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ही घटना कैद करण्यात आली आहे. या अपघातानंतर, आजूबाजूच्या परिसरात शांतता पसरली आहे. या अपघातामुळे थार चालकाचे चांगलेच नुकसान झाल्याची शक्यता आहे. फुटेज व्हायरल झाल्यानंतर, वापरकर्ते पावसात जास्त वेगाने गाडी चालवल्याबद्दल थार चालकाला दोष देत आहेत. दरम्यान, अपघातानंतर लोक थार चालकाबद्दल विचारणा करत आहेत. दरम्यान ही घटना कधी आणि कुठे घडून आली याची अधिकृत माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही.
#Monsoon 🚨 ⚠️ Looks like #takeoff ✈️ gone wrong with Mahindra Thar on Wet Surface… Wet Surface + Speed + Higher CG@DriveSmart_IN @dabir @uneaz @InfraEye
pic.twitter.com/i6VcYzmZFw — Dave (Road Safety: City & Highways) (@motordave2) October 28, 2025
या अपघाताचा व्हायरल व्हिडिओ @motordave2 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ओव्हरटेक केला नसता तर अनावश्यक खर्च टाळता आला असता” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्या धडकेमुळे ड्रायव्हर निघून गेला असावा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “असे दिसते की थार बाईकरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता, पण तो चुकीचा ठरला, ओव्हरटेक करताना त्याने लगेच ब्रेक मारला ज्यामुळे नियंत्रण सुटले आणि ट्रकला धडक दिली. थारच्या मागील दिव्यांवरून अंदाज आला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.