(फोटो सौजन्य: X)
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे, जिथे कधी काय दिसून येईल ते सांगता येत नाही. इथे असे बरेच व्हिडिओ शेअर केले जातात ज्यांचा विचार आपण स्वप्नातही केला नसावा आणि अशातच आता इंटरनेटवर एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात असे काही दृश्य दिसून आले जे पाहून सर्वच हादरले. उत्तर प्रदेशातील कानपूरमधून ही घटना समोर आली आहे. येथे सकाळी कानपूर-चौबेपूर महामार्गावरील मारियानी गावाजवळ रस्त्यावर हजारो मासे तडफडताना दिसून आले ज्यांना पाहून सर्वच हैराण झाले. नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
वास्तविक घडलं असं की, माशांनी भरलेली पिकअप व्हॅन डिव्हायडरला धडकली ज्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात मासे रस्त्यावर पसरले गेले. रस्त्यावर पडलेले मासे गावातील इतर लोकांना कळताच, लोकांनी मासे पाहण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. अनेकांनी हे दृश्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले आणि याचाच व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये कानपूर रस्त्यावर मोठ्या संख्येने मासे विखुरलेले आहेत. पाण्याची पातळी कमी असल्याने ते रस्त्यावर संघर्ष करताना दिसून आले. अपघाताच्या ठिकाणी पोलिस पोहोचेपर्यंत, जवळच्या गावकऱ्यांनी जवळजवळ एक क्विंटल मासे लुटले होते. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे.
यूपी–
कानपुर में मछलियों से लदी पिकअप पलट गई, लोग सड़क से मछलियों को बटोरकर ले गए !! pic.twitter.com/OtHus4dHni — Sachin Gupta (@SachinGuptaUP) October 29, 2025
कोल्ह्याला पंजात पकडलं अन् वादळात वाऱ्यासह आकाशात विलीन झाला गरुड, शिकारीचे थरारक दृश्य… Video Viral
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ @SachinGuptaUP नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “कानपूरमध्ये माशांनी भरलेला पिकअप उलटला; लोकांनी रस्त्यावरून मासे गोळा केले आणि ते घेऊन गेले”. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “फ्रीच कधीच कुणी काही सोडत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “रात्री फिश पार्टी झाली” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला आशा आहे की ड्रायव्हरला दुखापत झाली नसेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






