मुंबई : मुंबई लोकल ट्रेन (Mumbai Local Train) ही मुंबईनकरांची जीवनवाहिनी आहे. दररोज हजारो चाकरमान्यांचा प्रवास या लोकल ट्रेनवर अवलंबून असतो. परंतु या लोकल ट्रेनमधून प्रवास करणं काही सोपं काम नाही. कारण ट्रेनमध्ये इतकी प्रचंड गर्दी असते जणू विशेष प्रकारचं ट्रेनिंग घेतल्याशिवाय माणूस चढूच शकणार नाही. त्यात पुन्हा बसण्यासाठी जागा मिळण्यासाठी वेगळाच संघर्ष करावा लागतो. अशावेळी प्रवाशांमध्ये भांडण देखील होतात आणि अनेकदा ही भांडण हाणामारी पर्यंत जाऊन पोहोचतात. अशीच एक घटना पुन्हा मुंबई लोकल ट्रेनमधील महिलांच्या डब्यात घडली आहे.
Kalesh B/w Ladies inside Mumbai Locals Over Seatpic.twitter.com/grKe9h9QX5
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 15, 2022
सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एकमेकांना चिपकून महिला तरुणी उभ्या आहेत. अशात लोकल ट्रेनमधील सीटवरुन एक नाही दोन नाही, चार महिलांनी जोरदार राडा केला. एकमेकांचे केस ओढून चार महिला एकमेकांना बुक्क्यांचा आणि कानशिलांचा प्रसाद देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ कधीचा आणि कुठल्या लोकल ट्रेनमधील आहे याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर हा व्हिडिओ @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.