(फोटो सौजन्य: Instagram)
लग्न ही कोणत्याही स्त्रीसाठी आयुष्याची नवीन सुरूवात असते. लग्न करून सासरी जाण कोणत्याही स्त्रीसाठी काही साधी गोष्ट नाही. आजही हुंडा नावाची प्रथा सुरूच आहे, वेळोवेळी याचे दाखले आपल्याला नवनवीन घटनांमधून पाहायला मिळतात. लग्नानंतर मुलीला सासरच्यांकडून बराच जाच सहन करावा लागतो. आपल्या आई-वडिलांना त्रास होऊ नये म्हणून ती हे सर्व निमूटपणे सहन करते. अनेकदा मुलींना सासरच्यांकडून घराबाहेर देखील काढलं जात, अशात हताश झालेल्या मुलींना माहेरचाच रस्ता दिसू लागतो जिथे त्या आसरा घेऊ शकतात. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ज्यात एका सुनेला तिच्या सासऱ्यांनी घराबाहेर काढल्याचे दिसून आले. मात्र आपल्या माहेरी न जाता सुनेने असे खोचक पाऊल उचलले की ते पाहून सर्वांनाच थक्क झाले. चला यात नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो तुम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकतो. व्हिडिओमध्ये एक महिला साडी घालून आपल्या चेहऱ्यावर घुंघट घेऊन घराच्या दरवाजाबाहेर उंबऱ्यावर बसल्याचे यात दिसून आले आहे. तिच्या आजूबाजूला काही सामान ठेवल्याचेही व्हिडिओत दिसून आले आहे. तिच्या बाजूला पाण्याने भरलेला एक तांबा असतो. हे सर्व दृश्य पाहून तिला घराबाहेर काढल्यास समजत आहे. व्हिडिओमध्ये, ‘मरून जाईल पण माहेरी जाणार नाही असं म्हणत सासरवाडीतच उंबऱ्यावर बसून राहिली सून’ असं लिहिलं आहे. दरम्यान हा व्हिडिओ नक्की कुठला आहे हे अद्याप याबद्दल कोणतीच माहिती देण्यात आली नाही.
हा व्हायरल व्हिडिओ @made_in.marathi नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो युजर्सने पाहिले असून हजारो लोकांनी व्हिडिओला लाइक्स दिले आहेत तर काहींनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “खानदानी स्त्री अशा स्त्रीलाच मनतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शेवटी तुझ्या आईचे संसकार चांगले आहेत… म्हणून आजच्या मुलींना लाज वाटू दे हा विडिओ बगुन… पण ज्या निर्लज्ज आहेत त्यांना फरक नाही पडत.. ते तू करून दाखवलंस… “.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.