(फोटो सौजन्य: Instagra
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे, जिथे नेहमीच अनेक व्हिडिओज शेअर केले जातात. या व्हिडिओतील दृश्ये इतके अनोखे असतात की त्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसावा. हे दृश्य बऱ्याचदा आपल्या कल्पनेपलीकडचे ठरते आणि त्यामुळेच कमी काळात ते व्हायरलही होते. आताही इथे असाच एक रंजक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यातील दृश्ये तुम्हाला थक्क करतील आणि त्याच क्षणी आनंदही देतील. व्हिडिओ जंगलाचा राजा सिंहाबद्दल आहे, एरवी सर्वत्र आपली दहशत पसरवणारा सिंह व्हिडिओत मात्र एक वेगळ्या भूमिकेत दिसून आला. व्हिडिओतील त्याचा परोपकार पाहून सर्वच खुश झाले आणि त्याला पुकी सिंह म्हणू लागले. चला व्हिडीओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात, प्राणीसंग्रालयाचे दृश्य दिसून येत आहे ज्यात एक सिंह आपल्या पिंजऱ्यात आराम करत आहे. सिंहाला पाहण्यासाठी अनेक लोक तिथे आलेली असतात अशात दोन मुलं पिंजारीबाहेरून सिंहाला बघत त्याच्या पिंजऱ्याखालून आपला हात आत टाकण्याचा प्रयत्न करतात. खरंतर सिंह हा जंगलातील सर्वात धोकादायक प्राणी आहे अशात त्याच्यासोबत असे करणे धोक्याचे ठरू शकते. व्हिडिओत आपण पाहू शकता, यात काही मुलं सिंहाच्या पिंजऱ्याखाली हात टाकत फोनमध्ये त्याचे दृश्य टिपू पाहतात मात्र याचवेळी सिंह तिथे येतो आणि त्याचा हात पिंजऱ्याबाहेर ढकलून देतो. त्यांनाही कोणतीही दुखापत न करता सिंह गुपचूप त्यांना दूर राहण्यास सांगतो जे पाहून सर्वच खुश होतात आणि सिंहाची स्तुती करू लागतात. सिंहाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जंगलाचा धोकादायक शिकारीही लोकांच्या चांगल्याचा विचार करू शकतो हे पाहून युजर्स सुखावून गेले आहेत.
सिंहाचा व्हायरल व्हिडिओ @relatable._.life07 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘सिंह म्हणत असेल की, भावा हात बाहेर काढ सगळे माझ्यासारखे शरीफ नाहीत’ असे व्हिडिओमध्ये लिहिले आहे. व्हिडिओला आतापर्यंत चांगलेच व्युज मिळाले असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सगळे शरीफ नसतात मित्रा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सिंह म्हणत असेल अरे भूक नाही नंतर ये” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अरे हा तर पुकी सिंह”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.