आनंदावर क्षणातच पडलं विरजण! पूजन समारंभात बेधुंद होऊन नाचणाऱ्या महिलांना कारने चिरडले; घटनेचा लाइव्ह Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच अनेक अनोखे व्हिडिओ शेअर केले जातात, जे कधी आपल्याला हसवतात कधी भावुक करतात तर कधी थक्क करून जातात. इथे अनेक अपघातांचे दृश्यही शेअर केले जाते. आताही काही असेच घडले आहे. एका भयंकर आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. व्हिडिओतील दृश्ये फारच भीषण असून ती तुमच्या मनाला हेलावून टाकू शकतात. चला नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
ही घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ठाणे सिकंदरा परिसरात घडून आली. घडलं असं की, काही महिला आणि मुले विहिरीच्या पूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होत रस्त्यात बेधुंद होऊन नाचत होते. यावेळीच अचानक एक भरधाव कार वेगात तिथे येते आणि नाचणाऱ्या सर्व महिलांना चिरडत पुढे जाते. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात अर्धा डझन महिला आणि मुले जखमी झाली आहेत. तर घटनेचे लाइव्ह फुटेज आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ सिकंदरा पोलिस स्टेशन परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेपासून कार चालक फरार असल्याचे सांगितले जात आहे.
#WATCH: Agra, wedding celebrations turned into mourning. A speeding car plowed into a crowd, injuring several people. The video has gone viral#AGRA #BREAKING #AgraAccident @dgpup pic.twitter.com/6FbcMBp5WX
— UP BK NEWS📰 (@UP_BKSH) June 25, 2025
Technologia! नळातून पाणी पिण्यासाठी महिलेने लढवली अशी शक्कल पाहून म्हणाल…; VIDEO तुफान व्हायरल
घटनेचा व्हिडिओ हा @UP_BKSH नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्युज मिळाल्या असून अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सिकंदरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आवश्यक कायदेशीर कारवाई केली जात आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कारचालकाचे डोळे काय फुटले होते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.