(फोटो सौजन्य: Instagram)
जंगलातील धोकादायक प्राण्यांमध्ये बिबट्याचा प्रामुख्याने समावेश होतो. आपल्या वेगवान आणि चपळ शिकारीसाठी बिबट्या ओळखला जातो. सोशल मिडियावर याआधीही बिबट्याच्या शिकारीचे अनेक व्हिडिओज शेअर करण्यात आले आहेत मात्र आता जो व्हिडिओ इथे व्हायरल होत आहे, तो जरा वेगळा आहे. वास्तविक, या व्हिडिओमध्ये एक बिबट्या मानवी वस्तीत आल्याचे आढळले ज्यानंतर सर्वांचा एकच गोंधळ उडाला. मात्र यातही एक नवे दृश्य नजरेस पडले ज्याने सर्वांचा श्वास रोखून धरला. मोठमोठे प्राणी बिबट्याच्या वाटेला जात नाहीत आणि अशातच एका कामगाराने जंगलाच्या शिकाऱ्यावर हल्ला चढवला.
हा हल्ला इतका जबरदस्त होता की सर्वांचे डोळे खुलेच्या खुलेच राहिले. आपल्यावर झालेला हल्ला पाहून बिबट्याही काही क्षणासाठी हादरला आणि यानंतर काय घडले ते चला सविस्तर जाणून घेऊया. व्यक्तीचा हा हल्ला बिबट्याला इतका महागात पडेल असे कुणालाही वाटले नाही. ज्यानंतर तेथील लोकांनी हे दृश्य आपल्या कॅमेरात कैद केले आणि आता याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
काय आहे प्रकरण?
ही घटना उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी जिल्ह्यात येथे घडून आली. बिबट्याने अचानक येथील एका वीटभट्टीत एंट्री घेतली, ज्यानंतर इथे एकच धुमाकूळ उडाला. बिबट्या वीट भट्टीत काम करणाऱ्या कामगाऱ्यांवर हल्ला करतो ज्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तेथील एक कामगार बिबट्याशी चारहात करतो. व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्याशी लढतो आणि जंगलाच्या प्राण्याला अक्षरश: जमीनदोस्त करतो. कमेंट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी वन विभाग पोहोचला असून जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत. आपल्या हिमतीवर आपण कोणत्याही कठीण परिस्थितीवर विजय मिळवू शकतो हे आपल्या या व्हिडिओतून पाहायला मिळेल.
घटनेचा हा व्हायरल व्हिडिओ @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत चांगलाच व्युज मिळाले असून लोक आता व्हिडिओला वेगाने शेअर करत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.