'...कहत है ऋतुराज आयो' या लोकप्रिय गाण्यावर तरुणांनी सादर केले अप्रतिम सेमी-क्लासीकल; नेटकऱ्यांनी केले कौतुक, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन तरुणांनी अत्यंत अप्रतिम पद्धतीने गरज-गरज गाण्यावर सेमी-क्लासिकल नृत्य सादर केले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणांनी अतिशय उत्तमपणे नृत्य शादर केले आहे. दोघांनी पांढरे धोतर आणि शर्ट परिधान करुन छान असा लुक तायर केला आहे. नृत्य सादर करताना त्यांच्या चेहऱ्यावरही एक्सप्रेशन्स देखील अप्रतिम आहेत. तसेच त्यांच्या स्टेप्सदेखील एकदम स्पष्ट आहेत. हा व्हिडिओ सतत पाहावासा वाटत आहे. त्यावरुन नजर हटवणे देखील कठीण आहे. हा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @appu______2000 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ७० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत असून अनेकांनी तरुणांचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने अद्भुत कलाकार असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने शास्त्री आणि आधुनिक संगीताचा ताळमेळ छान आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्याने पुरुष शास्त्रीय नृत्य सादर करतात हे सर्वात सुंदर आहे, तर आणखी एकाने मी इंटरनेटवर आज पाहिलेली सर्वात छान रिल असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






