बहिणीच्या लग्नासाठीच झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे अकाउंट झाले ब्लॉक, भरस्त्यात रडतानाचा Video Viral
सध्याचे डिजिटल युग बघता आता अनेक गोष्टी ऑनलाईन होऊ लागल्या आहेत. आता कोणाला भूक जरी लागली तरी लोक घरबसल्या फूड ऑर्डर करतात. सध्या ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्यांची क्रेझ फार वाढत आहे. स्विगी, झोमॅटो यासारख्या फूड डिलिव्हरी कंपन्यांकडून झटपट जेवण मागवण्याचे प्रमाण आजकाल वाढताना दिसत आहे. या फूड डिलिव्हरी कंपन्यांमुळे अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. मात्र बऱ्याचदा सोशल मीडियावर या डिलिव्हरी बॉईजचे काही व्हिडिओज व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात डिलिव्हरी बॉय ढसाढसा रडताना दिसत आहे.
झोमॅटो डिलिव्हरी बॉयसोबत घडलेली घटना सध्या सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय बनली आहे. त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून आता अनेकजण यावर हळहळ व्यक्त करत आहेत. या व्हिडिओत डिलिव्हरी बॉय, झोमॅटो कंपनीने त्याचे अकाऊंट ब्लॉक केल्याचं गाऱ्हाण मांडताना दिसत आहे. त्याच्या बहिणीचे नुकतेच लग्न जमल्याने तो भररस्त्यात रडत लोकांकडे मदतीचे आवाहन करताना व्हिडिओतून दिसून येत आहे.
हेदेखील वाचा – विहिरीच्या आत राजवाडा पाहिला आहे का? 300 वर्षांपूर्वी मराठ्यांनी बांधला होता अंडरग्राऊंड वाडा, पाहा Viral Video
डिलिव्हरी बॉयचा हा व्हिडिओ सोहम भट्टाचार्य या युजरने आपल्या एक्स अकाउंटवर शेअर केला, त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याने पोस्टवर लिहिले की, ‘या व्यक्तीच्या बहिणीचे लग्न काही दिवसांवर आहे आणि झोमॅटो, झोमॅटो केअरने त्याचं अकाऊंट ब्लॉक केलं आहे. तो जीटीबीनगर जवळ रडत बसला होता, प्रत्येकाकडे जाऊन पैसे मागत होता. त्याने मला सांगितलं की, त्याने बहिणीच्या लग्नासाठी पैसे वाचवण्यासाठी काहीही खाल्लेलं नाही. कृपया शक्य असल्यासही पोस्ट व्हायरल करा.’ सोहमने 28 मार्चला या पोस्टसोबत झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा फोटो शेअर केला होता.
In a heart-wrenching incident, a Zomato delivery man from Delhi named Soham Bhattacharya broke down as he revealed that his account had been “blocked” by the food delivery giant just days before his sister’s wedding leaving him in a state of financial crisis. Bhattacharya’s … pic.twitter.com/nuwBjrrz5A
— ForMenIndia (@ForMenIndia_) March 29, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, या झोमॅटो फूड डिलिव्हरी बॉयचे नाव आयुष सैनी (Ayush Saini) असे आहे. सोहम भट्टाचार्यने सांगितले की, ‘मी कामावरून परतत होतो आणि हा व्यक्ती मला रडताना दिसला. दादा, मला मदत करा, मी असहाय्य आहे. माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि झोमॅटोनं माझं अकाऊंट बंद केलं आहे.उद्या मला तंबूवाल्यांना पूर्ण पैसे द्यायचे आहेत, पण झोमॅटो विक्रेत्याने माझे अकाऊंट डिलीट केलं आहे, आणि मी सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही, असं डिलिव्हरी बॉयने त्याला सांगितले
यांनतर सोहमने या पोस्टखाली एक क्यूआर कोड शेअर केला आणि या व्यक्तीला मदत करण्याची विनंती केली. आता ही पोस्ट तुफान व्हायरल झाली असून अनेक नेटकऱ्यांनी यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
हेदेखील वाचा – धक्कादायक! नाचताना साडी जनरेटरमध्ये अडकली अन् मृत्यूचा थरार कॅमेरात कैद, Video Viral
We deeply value our delivery partners, and we understand the impact that actions like blocking an ID can have. Rest assured, we take such matters seriously. We assure you, we’ll look into this. Our delivery partners are as important to us as our customers.
— Zomato Care (@zomatocare) March 28, 2024
दरम्यान घटनेची माहिती मिळताच झोमॅटोने दखल घेतली आणि आपल्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले की, ‘आयडी ब्लॉक करण्यासारख्या कृतींचा काय परिणाम होऊ शकतो याचा आम्हाला अंदाज आहे. आम्ही या या प्रकरणाची दखल घेतली असून याचा गांभीर्याने तपास करण्यात येईल.