आपल्या देशात अनेक प्राचीन वास्तू आहेत. प्राचीन आणि धार्मिक संस्कृतींनी समृद्ध देशातील अनेक गोष्ट जगप्रसिद्ध आहेत. देशात असे अनेक राजवाडे, किल्ले आहेत ज्यांचा भौगोलिक इतिहास आपल्याला थकक करून जातो. या वास्तूंना पाहिले की, 400-500 वर्षांपूर्वी अत्याधुनिक साधनांशिवाय या वास्तू नक्की कशा उभारल्या असाव्यात असा प्रश्न मनात येतो. सध्या अशाच एका प्राचीन वास्तूचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तुम्ही आजवर अनेक भव्य राजवाडे पाहिले असतील मात्र तुम्ही कधी विहिरीच्या आत बांधलेला राजवाडा पाहिला आहे का? नसेल तर आजच्या या व्हायरल व्हिडिओतून तुम्हाला या भव्य आणि खास राजवाड्याचे दर्शन करता येणार आहे. या राजवाड्याचे सौंदर्य बघता यापुढे ताजमहालदेखील फिका पडल्यासारखे वाटते. ही विहीर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे , जिच्या आत चक्क एक राजवाडा उभारण्यात आला आहे. अशी विहीर तुम्हाला देशातच काय तर पार जगात कुठे शोधूनही सापडणार नाही. या विहिरीला 12 मोटेची विहीर असेही म्हटले जाते.
हेदेखील वाचा – धक्कादायक! नाचताना साडी जनरेटरमध्ये अडकली अन् मृत्यूचा थरार कॅमेरात कैद, Video Viral
या विहिरीतील पाणी उपसण्यासाठी 12 मोटा लावण्यात आल्या आहेत. त्यामुळेच हिला 12 मोटेची विहीर असे संबोधले जाते. ही विहीर सातारा जिल्ह्यातील लिंब या गावात आहे. आपण हिला वास्तुकलेची एक अप्रतिम किमया म्हणू शकतो. कारण या विहिरीची रचना एका राजवाड्याप्रमाणे करण्यात आली आहे. या विहिरीभोवती एक भलामोठा अंडरग्राऊंड महल आहे.
इसवी सन 1719 ते 1724 या दरम्यान शाहू महाराजांची पत्नी वीरूबाई यांनी दगडी विहीर बांधल्याचे सांगितले जाते. जवळपास 100 फूट खोल आणि 50 फूट रुंद असलेली ही विहीर गावकऱ्यांसाठी आजीवन पाण्याचा उत्तम स्रोत आहे. 300 वर्षांपूर्वी या विहिरीच्या परिसरात जवळपास 3 हजार कलमांची आंब्यांची झाडे लावण्यात आल्याचे म्हटले जाते. मात्र परकीय आक्रमणे आणि त्यानंतर ब्रिटीशांच्या कार्यकाळात ही सर्व झाडे हळूहळू नष्ट होऊ लागली. दरम्यान आता या विहीरीचा सुरेख व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील विहीरीची दृश्य पाहून लोक थक्क झाले आहेत.
हेदेखील वाचा – सलमान खानलाही पडली गुलिगत सूरज चव्हाणची भुरळ, Viral Video पाहिलात का?
या विहिरीचा व्हिडिओ @chetanmahindrakar नावाच्या इंस्टग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, विहिरीचा पूर्ण पत्ता सांगण्यात आला आहे. अनेकांना हा व्हिडिओ फार आवडला असून काहींनी यावर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, खूप सुंदर माहिती दिलीत तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, किती सुंदर.