इस्रायलचे गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरुचं! आता गाझाच्या चर्चवर रॉकेट हल्ला, 16 पॅलेस्टिनी निर्वासितांचा मृत्यू

गाझा शहरातील एका ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चवर इस्रायली सैन्याने रॉकेटने हल्ला केला. रॉकेट हल्ल्यात किमान 16 पॅलेस्टिनी निर्वासितांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

    इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा (Israel Hamas War) आज 15 वा दिवस आहे. हे युद्ध दिवसेंदिवस अधिक तिव्र होताना दिसत आहे.  मंगळवारी इस्रायलने गाझा येथील रुग्णालयावर एयरस्ट्राईक (Airstrike On Hospital In Gaza) केला. या हवाई हल्ल्यात जवळपास 500 पॅलेस्टिनी ठार झाले होते. आता मिळालेल्या अपडेट नुसार,इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरूच ठेवले असून शनिवारी रात्री उशिरा, गाझा शहरातील एका ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चवर इस्रायली सैन्याने रॉकेटने हल्ला केला. रॉकेट हल्ल्यात किमान 16 पॅलेस्टिनी निर्वासितांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. येथे मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी निर्वासितांनी आश्रय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या चर्चने मृतांच्या संख्येची स्पष्ट आकडेवारी जाहीर केलेली नाही.

    गाझा हॉस्पिटलवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यात 500 लोकांचा मृत्यू

    गाझावरील इस्रायली हल्ल्यादरम्यान, गाझाच्या अल अहली हॉस्पिटलवर रॉकेट हल्ल्यात शेकडो जीव गेले. या हल्ल्यात 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयावरील हल्ल्याचा संपूर्ण जग निषेध करत आहे. दुसरीकडे, जगभरात निषेध सुरू झाल्यानंतर इस्रायल समर्थक राष्ट्र असलेल्या अमेरिकेने इस्रायलने हॉस्पिटलवर हल्ला केला नसल्याचा दावा केला. हा हल्ला हमास समर्थित इस्लामिक जिहाद संघटनेने केल्याचा दावाही इस्रायलने केला आहे. इस्रायलने काही व्हिडिओ फुटेज आणि ऑडिओ क्लिप जारी करून आपले मत व्यक्त केले आहे. इस्रायलने निष्पाप गाझानवर हवाई हल्ले केल्याचा दावा हमासने केला आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लहान मुले आणि वृद्धांना या युद्धाचा फटका बसला आहे.

    7 ऑक्टोबरला सुरू झालं हमास इस्रायल युद्ध

    शनिवार, 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला. हमासची लष्करी शाखा इज्ज अल-दिन अल-कासम ब्रिगेडने अल-अक्सा पूर मोहिमेची घोषणा केली. गाझामधून इस्रायलवर पाच हजारांहून अधिक रॉकेट डागण्यात आले आणि हजारो सैनिकही सीमेपलीकडून घुसले. घुसखोरांनी इस्रायलमध्ये प्रचंड नरसंहार घडवला होता. त्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आणि युद्धाची घोषणा केली. तो 13 दिवसांपासून सतत गाझावर हल्ले करत आहे. हवाई हल्ल्यात गाझापट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. सोमवारी गाझा येथील रुग्णालयात झालेल्या हल्ल्यात किमान पाचशे जणांना जीव गमवावा लागला. इस्रायल-हमास युद्धात पाच हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत. ठार झालेल्यांमध्ये बहुतेक गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी आहेत. इस्रायलमध्ये 304 सैनिकांसह 1405 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 3,968 लोक जखमी झाले आहेत. गाझामधील पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने 3,478 हून अधिक मृत्यू आणि 12,000 हून अधिक जखमी झाल्याची नोंद केली आहे. त्याच वेळी, वेस्ट बँकमध्ये 66 पॅलेस्टिनी ठार झाले आणि सुमारे 1,300 लोक जखमी झाले.