24 dead as Los Angeles fire takes a violent turn
कॅलिफोर्निया: लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीने विक्राळ रुप धारण केले आहे. या भीषण आगीमुळे 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे 150,000 हून अधिक लोकांना आपले घर सोडावे लागले आहे. अनेक इमारतीच्या इरमारती नष्ट झाल्या आहे. ही आगे 160 किलोमीटर परिसरात वेगाने पसरली आहे. यामुळे 150 बिलियन डॉलर्सपर्यंत नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आग लागण्याची कारणे आणि नुकसानाचे स्वरूप
सध्याच्या क्षणी आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक तपासात वीजपुरवठा यंत्रणेतील बिघाड किंवा मानवी दुर्लक्षामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. AccuWeather च्या अंदाजानुसार ही आग अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भीषण आणि महागडी नैसर्गिक आपत्ती ठरू शकते असे म्हटले जात आहे. 70,000 हून अधिक लोक वीजविहीन असून त्यात बहुतांश लोक लॉस एंजेलिस काउंटीतील आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- हाती लागलं सोन्याचं घबाड; पाकिस्तानचे दिवस पालटणार?
आगीमुळे प्रभावित क्षेत्र
मिळालेल्या माहितीनुसार, पॅलिसेड्स, ईटन, केनेथ आणि हर्स्ट या भागांमध्ये आगीचा मोठा परिणाम झाला आहे. यामुळे केवळ लोकांची घरेच नव्हे तर मशिदी, चर्च आणि आराधनालयांसराखे धार्मिक स्थळेही नष्ट झाली आहेत. अनेक सेलिब्रिटींची घरे देखील आगीत जळाली आहे. या आगीमुळे शैक्षणिक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. जवळपास 335 शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
सरकारी प्रयत्न आणि टीका
आग विझवण्यासाठी पाण्याचा साठा कमी पडत असल्याने कॅलिफोर्नियाचे राज्यपाल गेविन न्यूजॉम यांनी आगीची चौकशी करण्याचे आदेश दिले असून, पाण्याचा तुटवडा कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे. एलए फायर डिपार्टमेंटच्या प्रमुख क्रिस्टिन क्रॉली यांनी अग्निशमन दलासाठी पुरेशी आर्थिक मदत न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मेयर करेन बास यांनाही प्रशासनाच्या अपयशासाठी टीकेला सामोरे जावे लागत आहे.
सांता एना वाऱ्यांमुळे राष्ट्रीय हवामान विभागाने रेड फ्लॅग इशारे जारी केले आहेत. वाऱ्याचा वेग आणि पावसाचा अभाव यामुळे आगीचा विळखा आणखी मोठा होण्याची भीती वर्तवली आहे. प्रशासन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. लॉस एंजेलिसमधील या आगीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. विस्थापितांच्या मदतीसाठी सरकारी संस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या आपत्तीने आपत्कालीन व्यवस्थापन आणि पूर्वतयारीच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आहे.