Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK Vs AFG War: २७४ तालिबानी ठार, २२ लष्करी तळ उद्ध्वस्त! अफगाण संघर्षावर पाकिस्तानचा मोठा दावा

PAK Vs AFG War News Marathi: पाकिस्तानी लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्रभर आणि शुक्रवारी पहाटे अफगाणिस्तानच्या २२ लष्करी तळांवर भीषण हल्ले करण्यात आले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 27, 2026 | 08:49 PM
अफगाण संघर्षावर पाकिस्तानचा मोठा दावा (Photo Credit- )

अफगाण संघर्षावर पाकिस्तानचा मोठा दावा (Photo Credit- )

Follow Us
Close
Follow Us:

  • २७४ तालिबानी ठार
  • २२ लष्करी तळ उद्ध्वस्त!
  • अफगाण संघर्षावर पाकिस्तानचा मोठा दावा
PAK Vs AFG War News: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष आता अत्यंत हिंसक वळणावर पोहोचला आहे. गुरुवारी रात्री अफगाणिस्तानने केलेल्या प्रतिहल्ल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा आक्रमक लष्करी कारवाई केली. पाकिस्तानी लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्रभर आणि शुक्रवारी पहाटे अफगाणिस्तानच्या २२ लष्करी तळांवर भीषण हल्ले करण्यात आले. या कारवाईत सुमारे २७४ तालिबानी लढाऊ मारले गेल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. मात्र, या संघर्षात पाकिस्तानलाही आपल्या १२ सैनिकांना गमवावे लागले आहे.

पाकिस्तानी लष्कराचा निर्वाणीचा इशारा

पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते अहमद शरीफ चौधरी यांनी माध्यमांशी संवाद साधताना या मोहिमेची माहिती दिली. ते म्हणाले की, हे संपूर्ण ऑपरेशन पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. “अफगाण तालिबानला आता निवड करावी लागेल. त्यांना टीटीपी (TTP), बीएलए, अल-कायदा यांसारख्या दहशतवादी संघटनांसोबत राहायचे आहे की पाकिस्तानसोबत? ही भूमिका पाकिस्तानने यापूर्वीच स्पष्ट केली आहे,” असे खडेबोल चौधरी यांनी सुनावले.

दुसरीकडे, तालिबानने पाकिस्तानचे दावे फेटाळून लावत पलटवार केला आहे. तालिबानच्या दाव्यानुसार, त्यांच्या हल्ल्यात सुमारे ५५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे दोन्ही बाजूंकडून होणाऱ्या दाव्यांमुळे मृतांच्या नेमक्या आकड्याबाबत संभ्रम असला तरी संघर्षाची तीव्रता प्रचंड असल्याचे स्पष्ट होत आहे.

Pak Vs Afg War Live: पाकिस्तान मुळासकट संपणार? अफगणिस्तानचा PMO च्या जवळच एअरस्ट्राईक

पाकिस्तानची दुटप्पी भूमिका आणि इतिहास

आज पाकिस्तान तालिबानला दहशतवाद आणि मैत्री यापैकी एक निवडण्याचा पर्याय देत असला, तरी इतिहासातील पाकिस्तानची भूमिका संशयास्पद राहिली आहे. सोव्हिएत आणि अमेरिकन युद्धाच्या काळात याच पाकिस्तानने तालिबानला आश्रय दिला होता. विशेष म्हणजे, जगातील सर्वात मोठा दहशतवादी ओसामा बिन लादेन हा देखील पाकिस्तानी लष्करी तळाच्या अगदी जवळ मारला गेला होता. त्यामुळे पाकिस्तानच्या आजच्या भूमिकेवर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

शहबाज शरीफ यांचा ‘झिरो टॉलरन्स’चा इशारा

पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “फितना-अल-खवारिज आणि अफगाण तालिबान यांच्यातील संगनमत खपवून घेतले जाणार नाही. पाकिस्तानच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही कृतीप्रती आमचे धोरण शून्य सहिष्णुतेचे असेल.” लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी सशस्त्र दले कोणत्याही आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

युद्धजन्य परिस्थिती आणि नागरिकांचे स्थलांतर

गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या संघर्षामुळे आता युद्धाचे ढग गडद झाले आहेत. तोरखम सीमा परिसरात रात्रभर तोफखाना आणि गोळीबाराचे आवाज ऐकू येत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. सुरक्षिततेसाठी अनेक कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. अफगाण सैनिकही सीमेच्या दिशेने कूच करताना दिसत असल्याने आगामी काळात हा संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Afganistan vs Pakistan War: लष्कर आणि शस्त्रांस्त्रांच्या बाबतीत कुणाची ताकद सर्वात जास्त?

Web Title: 274 taliban killed 22 military bases destroyed pakistan makes big claim on afghan conflict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 08:49 PM

Topics:  

  • Afghanistan-Pakistan Attack
  • PAK vs AFG
  • World War

संबंधित बातम्या

Pak Vs Afg War Live: पाकिस्तान मुळासकट संपणार? अफगणिस्तानचा PMO च्या जवळच एअरस्ट्राईक
1

Pak Vs Afg War Live: पाकिस्तान मुळासकट संपणार? अफगणिस्तानचा PMO च्या जवळच एअरस्ट्राईक

PakAfgWar: युद्धाचा भडका! अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर सर्वात मोठा हवाई हल्ला; इस्लामाबाद, अबोटाबाद हादरले, लष्करी तळांवर बॉम्बवर्षाव
2

PakAfgWar: युद्धाचा भडका! अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर सर्वात मोठा हवाई हल्ला; इस्लामाबाद, अबोटाबाद हादरले, लष्करी तळांवर बॉम्बवर्षाव

Pak-Afghan War: पाकिस्तानी सैन्य कामचुकार! तालिबानकडून हारून गेले ‘या’ मुस्लिम राष्ट्रांच्या पाया पडायला; केली युद्धबंदीची विनंती
3

Pak-Afghan War: पाकिस्तानी सैन्य कामचुकार! तालिबानकडून हारून गेले ‘या’ मुस्लिम राष्ट्रांच्या पाया पडायला; केली युद्धबंदीची विनंती

War Alert: आता उघड युद्ध होईल! पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ तालिबानवर डाफरले; भारताचं नाव घेत ओकली विषारी गरळ
4

War Alert: आता उघड युद्ध होईल! पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ तालिबानवर डाफरले; भारताचं नाव घेत ओकली विषारी गरळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.