3 dead, many injured after train derails in Germany
बर्लिन : जर्मनीमधून एक मोठ्या अपघाताची बातमी समोर येत आहे. रविवारी (२७ जुलै) जर्मनीमध्ये एक प्रवासी ट्रेन रुळावरुन घसरली आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आगे. तर अनेकजण जखमी झाले आहे. जखमींची संख्या अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. जर्मनीच्या बाडेन-वुर्टेमबर्ग राज्यातील रिडलिंगेन शहराजवळ हा अपघात घडला. ट्रेनमध्ये शेकडो प्रवासी होते.
तसेच अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, बचाव पथक आणि पोलिसांसह सर्व आपत्कालीन पथकांनी घनास्थळी धाव घेती. तसेच बाडेन-वुर्टेमबर्गचे गृहमंत्री थॉमस स्ट्रॉबल (सीडीयू) देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्युनिकपासून सुमारे १५८ किलोमीटर अंतरावर रिडलिंगेनजवळ हा अपघात घडाला. स्थानिक वेळेनुसार, ६.१० वाजता हा अपघात झाला. ट्रेन सिग्मरिंगेनहून उल्मकडे जात असतामा अचानक ट्रेनचे दोन डब्बे रुळावरुन घसरले. सध्या जर्मनी संघीय आणि स्थानिक पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात, अपघातापूर्वी मुसळधार पाऊस आणि वादळाची परिस्थिती होती. यामुळे कदाचित भूस्खलनामुळे ट्रेन रुळावरुन घसरली असावी असे पोलिसांनी सांगितले.
ट्रेनमध्ये सुमारे १०० प्रवासी होते. सध्या अग्निशमन दल ट्रेनचे डबे सरळ करण्याचा आणि लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. डब्यांवरुन चढून लोकांना ट्रेनमधून बाहेर काढले जात आहे. दरम्यान याच वेळी जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांनी या अपघातबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी मदत आणि बचाव पथक गतिशीलपणे काम करत असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी अपघातात मृत पावलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहे. त्यांनी ही दुर्घटना अतिशय धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.
जर्मनी चान्सर मेर्झ यांनी सांगितले की, ते देशाच्या वाहतूक मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. शिवाय लोकांना वाचवण्यासाठी सर्व साधनसंपत्तीचा वापर करण्याचे आणि जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे निर्देश बचाव कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. कुलपतींनी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांप्रती तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहे. या अपघातामुळे रिडलिंगेन आणि मुंडरकिंगेन रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये आणि नागरिकांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. लो