इस्रायलकडून भारताची फसवणूक? BARAK-8 संरक्षण प्रणाली इतर देशांना एकतर्फी विकण्याचा कट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जेरुसेलम : भारत आणि इस्रायलमधील संरक्षण भागीदारी गेल्या अनेक दशकांपासून मजबूत राहिली आहे. परंतु अलीकडच्या काही घडामोडींमुळे या मैत्रीवर प्रश्व उपस्थित होत आहे. इस्रायलवर भारताच्या DRDO संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या मदीतने विकसित केलेली संरक्षण प्रणाली BARAK-8 एकतर्फी विकण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप होत आहे. इस्रायलने BARAK-8 चा वापर करुन Barak-MX नावाची नवी स्वतंत्र प्रणाली विकसित केली आहे. याची विक्री देखील सुरु करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
ही बाब भारतासाठी अत्यंत धोकादायक मानली जात आहे. Barak-8 सरंक्षण प्रणाली भारतासाठी अत्यंत महत्वाची आहे. ही प्रणाली २००६ साली सुरु करण्यात आली होती. यासाठी २५०० कोटी रुपयांची गुंतवणूतक भारताने केली होती. या प्रणीलीमुळे भारत पाकिस्तानच्या फतह-२ मिसाइलला नष्ठ करु शकला होता. यामुळे भारताची लष्करी ताकद जगासमोर आली होती. यामुळे भारताला जागतिक संरक्षण बाजारपेठेत नवी दिशा मिळाली होती.
या प्रणालीसाठी DRDO ने खास dual-pulse rocket motor विकसित केले. यामुळे मिसाइलची गती आणि दिशा बदलता येते. मात्र, इस्रायलने या तंत्रज्ञानाचा वापर न करता ही प्रणाली इतर देशांचा विकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा defnce.in वेबसाइटने केला आहे. इस्रायलने याची कॉपी करत Barak-MX प्रणाली तयार करुन ती विकण्याचा प्रयत्न केला आहे. ही प्रणाली इस्रायलने अझरबैजान आणि मोरोक्कोला देण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भात करार केल्याची माहिती समोर आली आहे.
या घडामोडींमुळे भारताच्या तांत्रिक योगदानाकडे इस्रायलने दुर्लक्ष केले असल्याचे म्हटले जात आहे. ग्लोबल डिफेन्स मार्केटमध्ये भारताची प्रतिमा धोक्यात येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे भारताच्या तात्रिंक कौशल्य, बुद्धिमता आणि डेटा हक्कांच्या मुद्द्यांवरही धोका निर्माण होत आहे. भारताची आर्थिक आणि धोराणात्मक भागीदारी यामुळे कमकुवत होत आहे.
सध्या भारत सरकार आणि DRDO या गोष्टींची गंभीर्याने दखल घेत आहे. इस्रायलने असेच वर्तन ठेवल्यास भविष्यात भारतासोबतच्या संरक्षण कराराला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याममुळे दोन्ही देशांती विश्वासाला तडा जाण्याची शक्यता आहे. ही बाब भारतासाठी राजनैतिक आणि धोरणात्मक दृष्टीने धोकादाक मानली जात आहे.